shivsena - Anil Jagtap  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena UBT News : बीड जिल्हाप्रमुख पदावरुन हटवलेल्या जगतापांना सहानुभूती ; 'हा माझा अंत नाही...’ ही पोस्टही चर्चेत

Datta Deshmukh

Beed News : शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे.आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे परत एकदा आक्रमक मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहेत. अशातच बंडानंतर काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्याकडे पुन्हा एकदा ठाकरेंनी स्वत :लक्ष घातले आहे.

कारण शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संघटनेत मोठ्या प्रमाणावर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.पण याच नव्या निवडीवरुन उलटसुलट चर्चांना राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत.आर्थिक व्यवहारातून पदे वाटप झाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यापूर्वीही पदांसाठी आर्थिक व्यवहार आणि वस्तूंची मागणी केल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारेवर करण्यात आला असतानाच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुखपदावरुन सहसंपर्कप्रमुख पद दिलेल्या अनिल जगताप यांना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनात आणि गुन्ह्यांतील निरापराधांवर कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न केल्यानेच पदावरुन काढल्याच्या प्रतिक्रिया देत ‘नव्याने सुरुवात करा, आम्ही सोबत आहोत’ असे इतर पक्ष व संघटनांतील पदाधिकारीही म्हणत आहेत. दरम्यान, अनिल जगताप यांनीही ‘हा माझा अंत नाही.....पेटेन उद्या नव्याने,हे सामर्थ्य नाशवंत नाही,छाटले जरी पंख माझे,पुन्हा उडेन मी ही सुरेश भटांची कविता सोशल मीडियावर केलेली पोस्टही चर्चेचा विषय झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शुक्रवारी शिवसेनेच्या जिल्हा संघटनेत फेरबदल झाले. पुर्वीच्या सुत्रानुसार दोन जिल्हा प्रमुख असलेल्या या पक्षात आता गणेश वरेकर, रत्नाकर शिंदे व परमेश्वर सातपुते हे तीन जिल्हा प्रमुख असतील. यापूर्वी काही महिने एकटे अनिल जगताप हेच जिल्हाप्रमुख होते. त्यांना पदावरुन काढून सहसंपर्कप्रमुख करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या.

यामध्ये इतर पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे हे विशेष.मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनात अनिल जगताप आघाडीवर असतात.जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांत निरापराधांवर कारवाई होऊ नये यासाठीही त्यांचे नेहमी प्रयत्न असतात.हा मुद्दाही नेटकऱ्यांनी नमूद केला आहे. तुमचा आंदोलनातील सहभाग सुषमा अंधारे यांना खुपल्याचा गंभीर आरोप नेटकऱ्यांतून होत आहे. आम्ही सोबत असल्याचेही नेटकरी म्हणत आहेत.(Uddhav Thackeray Shivsena)

MNS News : मनसे जिल्हाध्यक्षासह 45 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखलदरम्यान,दुसऱ्या दिवशी अनिल जगताप यांनी एका चित्रासह सुरेश भट यांची ‘हा माझा अंत नाही.....पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे, अजून अशी भिंत नाही,माझी झोपडी जाळण्याचे,केलेत कैक कावे..जळेल झोपडी अशी,आग ती ज्वलंत नाही..रोखण्यास वाट माझी,वादळे होती आतूर..डोळ्यांत जरी गेली धूळ,थांबण्यास उसंत नाही..येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो..अडथळ्यांना भिवून अडखळणे,पावलांना पसंत नाही ही कविता पोस्ट केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT