Yogesh Kadam News : भाजपनेते किरीट सोमय्या यांनी गेल्या आठवड्यात मालेगाव शहरात भेट दिली होती. यावेळी त्यांनी मालेगाव शहर बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचे केंद्र बनल्याचा आरोप केला होता. या विषयावर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. त्यानंतर हा प्रश्न शनिवारी थेट विधान परिषदेत चर्चेला आला.
त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी थेट गृह विभागाला आव्हान दिले. किरीट सोमय्या यांना माझ्याकडे पाठवा, घुसखोर पकडून देतो, असे ते म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी मालेगाव, संभाजीनगर, परभणी यांसह विविध शहरात बांगलादेशी असल्याचा दावा केला होता. आता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईत घुसखोर कारखाने चालवत असल्याचा आरोप केला.
या चर्चेतून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी थेट ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान दिले आहे. त्यामुळे या प्रश्नावरून उद्धव ठाकरे विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष आमने सामने आला आहे. त्यातून भाजपलाही वादात ओढण्याचा प्रयत्न झाला.
गृहराज्यमंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी विशेष अधिकारी उपलब्ध केल्याची माहिती दिली. गेली दोन वर्ष मालेगाव सह विविध शहरांमध्ये भाजपची बांगलादेशी नागरिकांबाबत राजकीय मोहीम सुरू आहे. यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. कुठेही पोलीस ठाण्यात बांगलादेशी नागरिक शोधणारे पथक चर्चेत आले नाही. कोणाला हे पथक दिसलेही नाही. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी घोषणा केलेले बांगलादेशी शोधणारे पोलिसांचे पथक गेले तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम घुसखोर हा सध्या प्रत्यक्ष कारवाई ऐवजी आरोप प्रत्यारोपांसाठीचा विषय बनला आहे. त्याचा फटका अशिक्षित आणि कागदपत्र नसलेल्या शहरवासीयांना बसतो. किरीट सोमय्या यांनी त्यावर रान उठवले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या विरोधकांच्या रडारवर आले आहेत. त्यात आता पोलिसांच्या 'त्या' पथकाचे भर पडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.