Ajit Pawar Plane Crash Report : 'अजितदादांचा 100 टक्के घातपात...',विमान अपघाताचा अहवाल जाहीर होताच विजय वडेट्टीवार कडाडले

Vijay Wadettiwar Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालावरच विजय वडेट्टीवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत हा घातपात असल्याचे म्हटले आहे.
Ajit Pawar Plane Crash Report
Ajit Pawar Plane Crash ReportSarkarnama
Published on
Updated on

Plane Crash Report : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण झाला. या अपघातामध्ये अजित पवारांचे निधन झाले. या अपघाताविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. दरम्यान, या अपघातविषयीचा प्राथमिक अहवाल हवाई उड्डाण मंत्रालयाच्या एएआयबी तपासण यंत्रणेनी जाहीर केला आहे. या 22 पानी अहवालातून अजिदादांचे विमान क्रॅश होण्याआधी झाडाला धडकले, असल्याचे नमूद केले आहे.

हा अहवाल प्रसिद्ध होताच काँग्रेसचे विधीमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी या अहवालावर संशय व्यक्त केला आहे. 'साम टिव्ही'शी बोलताना ते म्हणाले की, 'अहवालामध्ये जे सांगितलं गेलं आहे की ते विमान एका झाडाला अडकलं आणि खाली कोसळलं, अशी जर तकलादू थेरी देत असतील तर यातूनच स्पष्ट होत आहे की अजितदादांचा अपघात नाही तो घातपात आहे.'

'एक महिन्याने असा अहवाल येतो. अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. माझ्या मते हा अहवाल पूर्णता मॅनेज आहे. ठरवून दिलेला हा अहवाल आहे, असे मला वाटते. 100 टक्के हा अपघात नाही. हा अजितदादांचा घातपात आहे.', असे देखील ते म्हणाले.

Ajit Pawar Plane Crash Report
Junnar Panchyat Samiti: जुन्नरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची मोठी खेळी; एका मतासाठी थेट उपसभापतीपदाची ऑफर; NCP नेही प्लॅन बदलला

लपवण्याचा, दडपण्याचा प्रकार...

'सगळी गोष्टी कॅमेरामध्ये कैद झाल्या आहेत. ते विमान वरतीच कलटी झालेले दिसत आहे. आणि धडकन खाली आलं. त्यांच म्हणणं आहे कुठल्या झाडाला अडकून खाली कोसळलं, असा अहवाल पाहून त्यांना फटके मारले पाहिजेत. लपवण्याचा आणि दडपण्याचा प्रकार आहे, असा या अहवालातून दिसत आहे. या अहवालावर चर्चा झाली पाहिजे याबाबत आम्ही मागणी करू, असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.

Ajit Pawar Plane Crash Report
Parbhani District Bank Scam: ...तर परभणी जिल्हा बँकेची परवानगी होणार रद्द, पाच सदस्यीय समितीकडून चौकशी; नेमका घोटाळा काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com