Legal developments in Ashok Kharat case as special prosecutor Ajay Misar steps aside, with Shailendra Bagde set to represent the Maharashtra government. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात सरकारला पहिला झटका : खटला लढण्यासाठी विनंती केलेल्या वकिलाची ऐनवेळी माघार

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी अतिव्यस्ततेमुळे माघार घेतली. आता सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे सरकारची बाजू मांडणार आहेत.

Hrishikesh Nalagune

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा खटला लढण्यास विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी असमर्थता दर्शवली आहे. अतिव्यस्ततेचे कारण देत त्यांनी विशेष तपास पथकाला ही जबाबदारी घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. आता सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे या प्रकरणात सरकारची बाजू मांडणार आहेत.

अजय मिसर हे विशेष सरकारी वकील आहेत. यापूर्वी त्यांनी 2008 मालेगांव बॉम्बस्फोट, 2011 मधील दादर बॉम्बस्फोट, गँगस्टर रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सगळे खटले, नाशिक धान्य घोटाळा, बदलापूर प्रकरण, स्वारगेट अत्याचार प्रकरण अशा विविध प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे किंवा पाहत आहेत.

अशात मागील आठवड्यात विशेष तपास पथकाने मिसर यांना या खटल्याचे कामकाज पहावे अशी विनंती केली होती. अशोक खरातला पहिल्यांदा न्यायालयात हजर केले तेव्हा अजय मिसर तिथे उपस्थित होते. पण युक्तिवाद शैलेंद्र बागडे यांनीच केला होता. त्यानंतरच्या सुनावणीतही बागडे यांनीच सरकारची बाजू मांडली होती.

पण आता अशोक खरात प्रकरणाची दिवसेंदिवस व्याप्ती वाढत चालली आहे. महिलांशी संबंधित असल्याने प्रकरण अत्यंत संवेदनशील झाले आहे. त्यामुळे इतर खटल्यातील व्यस्तता बघता खरात प्रकरणाला वेळ आणि न्याय देता येणार नाही, असे म्हणत मिसर यांनी असमर्थता दर्शवली आहे.

अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महिलांना आपल्या जाळ्यात ओढवून त्यांच्यावर 'योनी पूजा' आणि 'योनी शुध्दीकरण'च्या विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केले, अनेकांची आर्थिक फसवणूक केली असे विविध आरोप खरातवर आहेत.

शिवाय हे अश्लील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात नवनवीन खुलासे केले जात आहे. सध्या त्याची एसआयटी चौकशी सुरु असून बुधवारी (1 एप्रिल) चौकशीचा 13 वा दिवस आहे. यात पोलिसांना तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT