Ashok Kharat Solapur Connection : अशोक खरातचं सोलापूर कनेक्शन उघड; माजी आमदाराकडून खरातच्या मुलीला 32 लाखांचा फ्लॅट भेट

Sangola News : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात सोलापूर कनेक्शन समोर आले. सुषमा अंधारे यांनी माजी आमदाराच्या सहभागाचा आरोप करत सांगोल्यात मोठी खळबळ उडवली आहे.
Ashok Kharat
Ashok Kharat Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 31 March : नाशिकचा भोंदू अशोक खरात याचं सोलापूर कनेक्शन अखेर उघड झालं आहे. विविध क्लृप्त्या करून महिलांना आपल्या जाळ्यात अडकविणाऱ्या अशोक खरात याचे राजकीय नेते हे अनुयायी होते, हे आता लपून राहिलेले नाही. सोलापूर जिल्ह्यातील एका माजी आमदाराने आपल्या गावात पूजेसाठी आणल्याचे उघड झाले आहे, त्याबाबतचा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यामुळे सांगोल्यात खळबळ उडाली आहे.

सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांचे अशोक खरात याच्यासोबतचे व्यवहार हळूहळू पुढे येताना दिसत आहेत. अशोक खरात याच्या मुलीला ३२ किंवा ३४ लाख रुपयांचा फ्लॅट ‘गिफ्ट डीड’ केलेला आहे. या सर्वांचे धागेदारे आपल्याला सांगोल्यात सापडतील, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या, अशोक खरात (Ashok Kharat) आणि इतर सर्व मंडळी ही सांगोल्यात पूजेला गेली होती. अनेक ठिकाणच्या पुजांना रुपाली चाकणकर आणि इतर मंडळी उपस्थित होती. ही सर्व मंडळी खरातचं प्रस्थ वाढविण्यासाठी प्रयत्न करत होती.

अशोक खरातच्या मंदिर आणि परिसराला 2018 मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या कार्याकाळात पर्यटनाचा दर्जा मिळाला होता. त्या दर्जामुळेच खरातच्या मंदिराला निधी आणि सुविधा या मिळाल्या होत्या, असाही दावा अंधारे यांनी केला आहे.

Ashok Kharat
Satara ZP Update : सातारा जिल्हा परिषदेतील राड्याचं गूढ वाढलं; पत्रातून ‘सीसीटीव्ही’बाबतचं वास्तव उघडकीस...

ईव्हीडब्ल्यू आणि गृहमंत्री या दोघांना भेटून या सर्वांचे पुरावे द्यायला मी तयार आहे. या संबंधांनी असणारी कागदपत्रे आणि धागेदारे सांगेाल्याचे दीपक साळुंखे यांच्यापर्यंत जातात. या सर्व लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत, अशी मागणीही अंधारे यांनी केली.

Ashok Kharat
Solapur Corporation : 'मी बोलताना मध्ये का येतो; माझं भाषण थांबवणारा तू कोण?' : सोलापूरमध्ये शिवसेना-भाजप नगरसेवक हातघाईवर

हेमंत गोडसेंमुळे अशोक खरात अमित शाहांपर्यंत पोचला

लोकसभा निवडणुकीच्या वेळी हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी मिळत नव्हती. पण, नाशिक लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळावी; म्हणून हेमंत गोडसे यांनी प्रायव्हेट चार्टर्डने अशोक खरात याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे नेले होते. त्यावेळचा अमित शाह यांच्यासोबत अशोक खरात याचा फोटो आहे. शाह यांच्याकडे अशोक खरात याला माजी खासदार गोडसे यांनीच नेले होते.

Ashok Kharat
Ashok Kharat : SIT चौकशीत नवीन अपडेट: 40 ते 45 नेते खरातच्या संपर्कात; राजकीय निर्णय घेण्यापूर्वी घेत होते सल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com