Nashik Viral Video Ashok Kharat Falls Silent Before Police Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Case : केवळ लैंगिक शोषणच नाही, तर त्यापुढेही खरातचा अघोरीपणा; 'त्या' कृत्यांची हादरवणारी माहिती समोर

Ashok Kharat case shocking details revealed : अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत असून लैंगिक शोषणापलीकडील गंभीर गुन्ह्यांचे उघड झालेले तपशील जाणून घ्या.

सरकारनामा ब्युरो

New revelations in Ashok Kharat controversy: भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण उघड झाल्यापासून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. स्वतःला ज्योतिषी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या खरातने केवळ लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला नाही तर त्यामागे एक भयावह आणि घाणेरडे चाळे करून लोकांना त्याचा जाळ्यात फसवसे आहे. या प्रकरणा बद्दल आता नवनवीन खुलासे होत असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे महिलांवरील अत्याचार. अशोक खरात महिलांना आधी जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करत असे. इतक्यावरच तो थांबला नाही, तर काही महिला आणि पुरुषांना परस्पर संबंधांसाठी भाग पाडून त्याचे व्हिडिओ तयार केले जात असल्याचेही समोर आले आहे. या माध्यमातून अनेक श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांना ब्लॅकमेल केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

त्यासोबतच मीरपूर परिसरातील ईशानेश्वर मंदिराच्या मागील जंगलात तो भक्तांना पूजेसाठी बोलवत असे. त्या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण करून अघोरी विधींचा आधार घेत लोकांना मानसिकदृष्ट्या कमकुवत केले जात होते. यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये 5 महिला आणि 1 पुरुष तक्रारदार आहेत. कालच 3 महिलांनी पुढे येत आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार नोंदवली. तपासादरम्यान, कुटुंबियांना बाहेर ठेवून महिलांना वेगळ्या खोलीत नेऊन अत्याचार केल्याचा समान प्रकार उघड झाला आहे.

अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली जाणार आहे. तपास अधिक खोलात जात असताना आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, शिर्डी परिसरात त्याची कोट्यवधींची मालमत्ता असल्याचेही उघड झाले आहे. 48 गुंठे जागेवरील सिल्वर ओक लॉन्ससह विविध ठिकाणी त्याने गुंतवणूक केली असल्याची माहिती आहे. काही उद्योगांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT