Ashok Kharat scam investigation details Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat investigation updates : अशोक खरातचा तपास फिरतोय गोल गोल, दीड महिन्यात सापडेना गुंगीचे औषध!

Ashok Kharat investigation updates : अशोक खरात गुन्हा प्रकरणात तपासाला गती नाही. दीड महिन्यानंतरही गुंगीचे औषध सापडले नसल्याने प्रश्नचिन्ह कायम.

Sampat Devgire

Women's atrocities case: वादग्रस्त भोंदूबाब कॅप्टन अशोक खरात याला आठव्या गुन्ह्यात अटक होणार आहे. न्यायालयाने आज 'एसआयटी'ला तशी परवानगी दिली. त्यामुळे अशोक खरातचा एसआयटी कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

वादग्रस्त कॅप्टन अशोक खरात याची आज न्यायालयात ऑनलाईन हजेरी झाली. न्यायालयाने कॅप्टन खरातला १४ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यामुळे खरात गेले सुमारे ४० दिवस तपासासाठी एसआयटी पथकाच्या ताब्यात आहे.

एसआयटी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती देसाई यांनी कॅप्टन खरात याला आठव्या गुन्ह्यात ताबा हवा असल्याचे सांगितले. न्यायालयाने त्याला तात्काळ मंजुरी दिली. घराच्या वकिलांनी त्याला केलेला विरोध न्यायालयाने ग्राह्य धरला नाही.

आता न्यायालयीन प्रक्रियेनुसार कॅप्टन खरात याला उद्या पुन्हा ऑनलाईन न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर त्याची कोठडी एसआयटी पथकाकडे जाईल. त्यामुळे कॅप्टन खरात याचा ताबा पुन्हा एकदा एसटी पथकाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

एसआयटी पथकाकडून कॅप्टन खरात याला आठव्या गुन्हात अटक करण्यात येणार आहे. हा गुन्हा एका पिढीत महिलेचा दोन वर्ष सातत्याने शारीरिक छळ व अत्याचार केल्याचा आहे. यापूर्वीचे सात गुन्हे देखील याच स्वरूपाचे होते. विशेष म्हणजे आजवरच्या तपासात एसआयटी पथकाकडून फक्त एकदा तपासाची तांत्रिक माहिती देण्यात आली. खरात प्रकरणात काय तपास झाला आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे काय हे अद्याप पोलिसांकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.

कॅप्टन खरातला १८ मार्चला एसटी पथकाने पहिल्यांदा ताब्यात घेतले. तेव्हापासून सातत्याने न्यायालयात कॅप्टन खरात महिलांवर अत्याचार करतो. त्यासाठी गुंगीचे औषध वापरण्यात आले. हे औषध कोणते याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे या संदर्भात माध्यमांतून गुंगीचे औषध काय व कोणते याची सविस्तर माहिती प्रसिद्ध झाली आहे.

आज चाळीस दिवसानंतरही वादग्रस्त कॅप्टन खरात तपास पथकाच्या ताब्यात आहे. मात्र गुंगीच्या औषध नेमके काय याबाबतचा खुलासा तपास पथकाकडून होऊ शकलेला नाही. त्यामुळे एसआयटी पथकाचा तपास एकाच ठिकाणी गोल गोल फिरतो आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT