A viral video from Nashik shows Ashok Kharat guiding a former MP through black magic rituals, sparking major political controversy. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat : माजी खासदाराला खरातची काळी जादू पडली 'महागात'; ठाकरेंची साथ सोडताच झाले पराभवाचे धनी!

Ashok Kharat Nashik black magic controversy : माजी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित नेता खरात याच्याशी सहकार्यासह सल्लामसलत करत आहे. पुढे एक सहकारी करायचा प्रयोग करण्यासाठी जादूटोणा तयारी करीत असल्याचे दिसते. या माजी खासदाराने अशोक खरातचा सल्ला ऐकला.

Sampat Devgire

Nashik News, 28 Mar : भोंदूबाबा अशोक खरात याच्या गंडा दोरा आणि अघोरी प्रयोगाला अनेक बळी पडले. यात आता एका नव्या नावाचा समावेश झाला आहे. त्या नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोणताही मोठा राजकीय निर्णय घेण्यापूर्वी काही नेते भोंदू अशोक खरातचा सल्ला आणि उपाय घेत होते. नाशिकच्या एका माजी खासदाराने कॅप्टन खरातकडे असाच जादूटोणा केला होता. मात्र तो त्याच्यावरच उलटल्याने चर्चेचा विषय आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे दोनदा खासदार केले. मात्र महत्त्वाकांक्षा वाढल्याने एका माजी खासदाराला केंद्रात मंत्री पदाची स्वप्नं पडू लागली होती. त्यासाठी तो चक्क भोंदूबाबा खरातला शरण गेला होता. या माजी खासदाराने उद्धव ठाकरेंनी खासदारकी दिली तरी त्यांच्याशी प्रातारना केली. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यासाठी हा प्रवेश कसा फायदेशीर व सत्तेत मोठे पद देणारा ठरेल याचा तोटका खरात याने दिला होता, असे पुढे आले आहे.

या संदर्भात संबंधित माजी खासदाराचा व्हिडिओच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित नेता खरात याच्याशी सहकार्यासह सल्लामसलत करत आहे. पुढे एक सहकारी करायचा प्रयोग करण्यासाठी जादूटोणा तयारी करीत असल्याचे दिसते. या माजी खासदाराने अशोक खरातचा सल्ला ऐकला.

त्यानुसार काही तांत्रिक विधी केले. विधीसाठी बक्कळ श्रीमंती असल्याने या माजी खासदाराला काही लाख मोजावे लागले, असे पोलिसांच्या जबाबात संबंधितांनी सांगितल्याचे कळते. अशोक खरात याच्या सांगण्यानुसार संबंधित नेत्याने हा प्रयोग केला. मात्र हा प्रयोग केल्याने सर्व खेळ उलटा पडला. निवडणुकीत त्याला उमेदवारी मिळते की नाही अशी अनिश्चितता निर्माण झाली होती.

शेवटच्या क्षणी त्याला उमेदवारी मिळाली. त्यानंतर त्याला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या या माजी खासदाराची अवस्था राजकीय अडगळीत पडल्यासारखे झाली आहे. कॅप्टन खरातचा जादूटोणा त्याला आर्थिक भूर्दंड बसण्या पलीकडे काहीही कामाला आला नाही. केंद्रात मंत्री होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या नेत्याची खासदारकीही गेली, अशी नामुष्की त्याच्यावर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT