Assembly Election update : काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा, बड्या नेत्यानं मिळवली भाजपची उमेदवारी; आता राजकारण फिरलं अन् जिंकणं झालं अवघड...

Assam Election Row | Pradyut Bordoloi | BJP Internal Challenge : जयंता दास यांच्या उमेदवारीमुळे भाजपसमोर दिसपूरमध्ये मोठे आव्हान उभे राहिले आहे. हा मतदारसंघ काँग्रेसनेही प्रतिष्ठेचा केला आहे.
BJP| Congress
BJP| CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress MP resignation : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता वाढू लागला आहे. भाजपच्या सत्ता असलेल्या आसाममध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने जोर लावला असून निवडणुकीआधी अनेक काँग्रेस नेत्यांना पक्षात घेतले आहे. एका विद्यमान खासदारानेही विधानसभेसाठी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, आता या माजी खासदाराचे टेन्शन वाढले आहे.

आसाममधील दिसपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रत्युत बोरदोलोई यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तेही भाजपमधूनच. बोरदोलोई हे आसाममधील नागांव लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार होते. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळविला होता. पण विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपच्या पहिल्याच उमेदवारी यादीत प्रद्युत यांना दिसपूर मतदारसंघातून यांचे नाव आले. मात्र, त्यानंतर भाजपमध्येच असंतोष निर्माण झाला. याच नाराजीतून पक्षाचे नेते जयंत दास यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत प्रद्युत यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. दास यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. ते पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तसेच प्रवक्ते होते.

BJP| Congress
Tukaram Mundhe News : कुणालाच जमलं नाही ते तुकाराम मुंढेंनी करून दाखवलं! दिव्यांगासाठी घेतला महत्वाचा निर्णय

दास यांच्या उमेदवारीमुळे भाजपसमोर दिसपूरमध्ये मोठे आव्हान उभे राहिले आहे. हा मतदारसंघ काँग्रेसनेही प्रतिष्ठेचा केला आहे. त्यातच दास यांच्यामुळे भाजपच्या मतांमध्ये मोठी फूट पडण्याची भीती पक्षातील कार्यकर्त्यांकडूनच व्यक्त केली जात आहे. दास यांनी प्रचारातही आघाडी घेत प्रद्युत यांचे टेन्शन वाढविले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

BJP| Congress
Lockdown news : देशात कोरोनासारखा लॉकडाऊन लागणार का? मोदी सरकारनेच दिली मोठी अपडेट

दरम्यान, आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी संपूर्ण ताकद झोकली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप विरूध्द काँग्रेस अशी लढत न होता या निवडणुकीला आता सरमा विरूध्द गोगोई असा रंग चढला आहे. गोगोई हे राहुल गांधी यांचे निकवर्तीय नेते आहेत. तर माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे पुत्र आहेत.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com