Nashik News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात हा शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या अटकेत आहे. तर त्याची पत्नी कल्पना खरात एसआयटीनं चौकशीचा फास आवळताच फरार झाली आहे. ती फरार झाल्यामुळे तिचा खरातच्या काळ्या कारनाम्यांमध्ये मोठा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशोक खरातची बायको परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी केली आहे.याचदरम्यान,आता कल्पना खरातच्या बायकोबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याचं समोर येत आहे. कल्पना खरातने अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे.राहाता न्यायालयात 4 एप्रिलला अर्ज केल्याची सूत्रांची माहिती आहे.या अर्जावर 10 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
कल्पना खरात शिर्डीतील सावकारकी, फसवणूक गुन्ह्यातील आरोपी आहे. लैंगिक शोषण आणि शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात अडकलेली भोंदू बाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिने फरार झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. जमीन फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार होती, त्यानंतर तिने हा कायदेशीर पर्याय निवडल्याचं समोर येत आहे.
कल्पना खरात ही फरार असून, एसआयटी पथक व शिर्डी पोलिसांकडून तिचा गेल्या आठ दिवसांपासून शोध सुरु असून ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. कल्पना खरात विरोधात शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर एसआयटीचे पथक खरातच्या घरी गेले असता पत्नी कल्पना फरार झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे घरी असलेला खरातचा मुलगा हर्षवर्धन याला एसआयटीने ताब्यात घेतलं होतं. त्याची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं.
शिर्डीत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अटक करणार या भीतीमुळे कल्पना खरात फरार झाल्याची माहिती आहे. अशोक खरात याच्यावर केवळ लैंगिक शोषणाचेच नाही, तर जमिनीच्या फसवणुकीचेही गंभीर आरोप आहेत. शिर्डी येथील 5 एकर जमिनीच्या खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना आणि इतर 5 जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या तक्रारीनुसार, कर्ज फेडण्याच्या बहाण्याने व्याजाने पैसे देऊन जमीन हडपल्याचा आरोप आहे. दरम्यान, शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर खरातची पत्नी फरार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोन आरोपींना राहाता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराला सावकारीच्या नात्याने पैसे दिले होते? एक मोठा व्याजदराने पैसे दिले होते? आणि त्याच्या बदल्यात जमिनीची खरेदी करून घेतली आहे? या प्रकरणाचा शिर्डी पोलीस बारकाईने तपास करत आहे.
अटक केलेल्या दोन आरोपींना राहाता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराला सावकारीच्या नात्याने पैसे दिले होते? एक मोठा व्याजदराने पैसे दिले होते? आणि त्याच्या बदल्यात जमिनीची खरेदी करून घेतली आहे? या प्रकरणाचा शिर्डी पोलीस बारकाईने तपास करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.