Sharad Pawar Statement: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? शरद पवारांनी थेट मुद्द्यालाच हात घातला; म्हणाले...

Baramati By-Election News: अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायाची ताकद मिळेल, असं वक्तव्य केलं होतं. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुनेत्रा पवारांबाबत मोठं विधान केलं आहे.
Sunetra Pawar, Sharad Pawar
Sunetra Pawar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. यावेळी त्यांनी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायाची ताकद मिळेल, असं वक्तव्य केलं होतं. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुनेत्रा पवारांबाबत धक्कादायक विधान केलं आहे.

शरद पवारांनी सोमवारी(ता.6 एप्रिल) राज्यसभेची तिसऱ्यांदा सदस्य म्हणून शपथ घेतली.यानंतरच्या पत्रकार परिषदेत पवारांनी बारामती पोटनिवडणूक ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबापर्यंतची आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांना बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? या पत्रकारांच्या प्रश्नाला पवारांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं.

शरद पवार म्हणाले, लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आताच्याच उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. त्या आता त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढत आहेत. शिवाय आम्ही उमेदवार दिला नाही. जर आमच्या पक्षानं उमेदवारच दिला नाही, तर प्रचार करण्याचा प्रश्न येतो कुठे, असा प्रतिसवालही पवारांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यात आला होता. याबाबत त्यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले, जर त्यांनी माझा फोटो लावला असेल, तर ते चुकीचे आहे. मोदी-अमित शाह यांचे फोटो लावले असतील, तर त्यात चुकीचं नाही असंही शरद पवारांनी यांनी सांगत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटकारलं.

Sunetra Pawar, Sharad Pawar
Harshwardhan Sapkal News: बारामती पोटनिवडणुकीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या उमेदवारानं अर्ज भरला; पण सपकाळांची दांडी..? कारण आलं समोर

तो निर्णय माझाच...

अजित पवारांबद्दल मतदारसंघात आदर आहे. दुर्देवाने अपघाती निधनानं ते गेले. अजित पवार यांच्या जाण्याचं दु:खं संपूर्ण पवार कुटुंबाला आहे. त्यामुळेच आम्ही बारामतीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. आणि आमच्या पवार कुटुंबात एक पध्दत आहे, कुटुंबप्रमुखांची भूमिका आमच्या कुटुंबात मानली जाते. आज कुटुंबप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे, असं पवारांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com