Bhausaheb Wakchaure Wife Reaction Sakarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhausaheb Wakchaure Wife Reaction : दिल्लीत काय चाललंय? भाऊसाहेब वाकचौरे गायब? पत्नी म्हणाल्या… सकाळपासून संपर्क नाही

Bhausaheb Wakchaure sudden Delhi visit has sparked speculation amid reports possible split Uddhav Thackeray Shiv Sena, while his wife breaks silence first Time : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार-आमदारांना व्हीप बजावला असून, दिल्लीत असलेल्या भाऊसाहेब वाकचौरेंच्या हालचालींकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

Pradeep Pendhare

Uddhav Thackeray MP Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील सहा खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची दिल्लीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच शिवसेना ठाकरे पक्षाने आपल्या खासदार आणि आमदारांना तातडीने व्हीप बजावल्याची माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण राजकीय घडामोडीत आता सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांच्या भूमिकेची! शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनाही पक्षाकडून व्हीप बजावण्यात आला आहे. ते सध्या दिल्लीमध्ये असल्याने ते नेमक्या कोणत्या राजकीय हालचाली करत आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या चर्चांदरम्यान खासदार वाकचौरेंच्या पत्नी सरस्वती वाकचौरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “भाऊसाहेब काल सायंकाळी विमानाने दिल्लीला गेले. आज हरिद्वार येथे धार्मिक कार्यक्रमासाठी ते जाणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्यांनी याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. मला हे फक्त बातम्यांमधून समजत आहे.”

सरस्वती वाकचौरे पुढे म्हणाल्या की, “ते दिल्लीला जाणार आहेत हे मला माहिती होते. दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्कही केला होता. मात्र आज सकाळपासून त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. मोबाईल बंद आहे का, हेही मला माहिती नाही. त्यांच्या राजकीय निर्णयावर मी काही बोलू शकत नाही, कारण मला त्या बाबतीत फारसा अभ्यास नाही.”

विशेष म्हणजे, खासदार वाकचौरे काल शिर्डीतून थेट दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या चर्चित ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ते भूमिका बदलणार का, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नेहमी कार्यकर्त्यांनी गजबजलेले वाकचौरेंचे शिर्डीतील निवासस्थान आणि कार्यालय आज मात्र पूर्णपणे शांत दिसत होते.

शिवसेनेत फूट अन् वाकचौरेंची घरवापसी

राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर चार वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली होती. त्यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे घरवापसी केली.

खासदार वाकचौरेंना त्यावेळी होता विरोध

वाकचौरेंच्या पुनरागमनाला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध होता. मात्र तो विरोध बाजूला सारत उद्धव ठाकरे यांनी स्वतः मातोश्रीवर त्यांना पुन्हा पक्षात घेतले. “चूक केली होती, पाप नाही,” असे म्हणत ठाकरे यांनी त्यांना पुन्हा शिवबंधन बांधले आणि 2024 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

तेच भाऊसाहेब वाकचौरे.....

या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव करत पुन्हा एकदा शिर्डीचे खासदारपद पटकावले. आता दिल्लीत सुरू असलेल्या हालचालींमुळे सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा विश्वास दाखवला, तेच भाऊसाहेब वाकचौरे आता ‘ऑपरेशन टायगर’चा भाग बनणार का? महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT