Shiv Sena UBT in Trouble : भाऊसाहेब वाकचौरे ऑनलाईन हजर होते की, कुटुंबियांसोबत बाहेरगावी? ‘ऑपरेशन टायगर’ चर्चेत आणखी भर

Bhausaheb Wakchaure online meeting controversy: शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे शिर्डी इथले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्ष बैठकीला उपस्थितीच्या परस्पर दाव्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.
Bhausaheb Wakchaure family trip controversy
Bhausaheb Wakchaure family trip controversySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Shiv Sena MP Crisis : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नऊ खासदार एकसंघ असून ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम आहेत, असा दावा खासदार संजय राऊत यांनी सोमवारी ठामपणे केला. मात्र याच बैठकीत शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीवरून मोठा संभ्रम निर्माण झाला असून ठाकरे गटात नवा राजकीय सस्पेन्स तयार झाला आहे.

राज्यात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या ऑपरेशनअंतर्गत ठाकरे गटातील तब्बल सात खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने रविवारी ‘मातोश्री’वर खासदारांची विशेष बैठक बोलावली होती.

या बैठकीला चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर उर्वरित पाच जण दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्याचा दावा पक्षाकडून (ShivsenaUBT) करण्यात आला. यात भाऊसाहेब वाकचौरे हे ऑनलाईन उपस्थित होते, असे पक्षाने सांगितले. मात्र याचवेळी त्यांच्या कुटुंबियांनी ते कौटुंबिक कारणामुळे बाहेरगावी असल्याचे सांगितल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Bhausaheb Wakchaure family trip controversy
Sanjay Jadhav Skips Meeting : ‘मातोश्री’लाही दांडी, MVA बैठकीतही गैरहजर; संजय जाधवांचं ‘काहीतरी ठरलंय’ का?

वाकचौरे यांच्या मौनामुळे संभ्रम वाढवला

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना वाकचौरे यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संपर्काबाबत विचारलेल्या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले होते. त्यांनी मौन बाळगल्याने त्यांच्या भूमिकेबाबत आधीपासूनच चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर पक्ष बैठकीपूर्वी ते ‘नॉट रिचेबल’ झाल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना आणखी खतपाणी मिळाले.

Bhausaheb Wakchaure family trip controversy
Sujay Vikhe On Bhausaheb Wakchaure : भाऊसाहेब वाकचौरे ‘यूबीटी’त राहणार की 'NDA'त जाणार? सुजय विखेंकडून ‘स्वागता’चे संकेत

मेळाव्याला अनुपस्थिती अन् खुलासा

दरम्यान, शिर्डीत खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यालाही वाकचौरे अनुपस्थित होते. नंतर त्यांनी आपण पंजाबमध्ये संसदीय समितीसोबत अभ्यास दौऱ्यावर असल्याचे स्पष्टीकरण दिले. पण पक्ष बैठकीपासून दूर राहणे आणि कुटुंबियांकडून वेगळी माहिती समोर येणे, यामुळे संशय अधिक गडद झाला आहे.

वाकचौरे यांच्या मुलीचा वेगळा दावा

संजय राऊत यांनी वाकचौरे हे ऑनलाईन बैठकीत सहभागी झाल्याचा दावा केला असला तरी शिर्डीत त्यांच्या मुलीने आत्या आजारी असल्याने आई-वडील त्यांना भेटण्यासाठी बाहेर गेले आहेत, असे सांगितले. या परस्परविरोधी दाव्यांमुळे आता भाऊसाहेब वाकचौरे नेमके कोणत्या भूमिकेत आहेत, याबाबत मतदारसंघासह राज्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.

भविष्यात मोठ्या घडामोडी?

एकीकडे शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ आणि दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्षातील खासदारांच्या हालचाली, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवस मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com