Bhausaheb Wakchaure  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhausaheb Wakchaure : ठाकरेंच्या खासदारानं महायुतीविरोधात भात्यात भरले 'अग्नीबाण'; 'जलजीवनपासून सर्वच काही...'

Pradeep Pendhare

Bhausaheb Wakchaure News : शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार तयारी केली आहे. "दिल्लीत चाललो आहे. गेल्या दहा वर्षांचा हिशोब घेतो. जलजीवनचा सरकारी पैसा कुठे मुरलाय, त्याचा हिशोब घेतो", असा खणखणीत इशारा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिला.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा महायुती शिवसेनेचे (Shiv Sena) उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात लोकसभेला शिर्डी मतदारसंघात अटीतटीची 'सामना' झाला. खासदार वाकचौरे आता दिल्लीला चालले आहे. दिल्लीला जाताच 'जलजीवन'चा हिशोब घेतो. सरकारी पैसा कुठे मुरलाय ते पाहातो. कोणाच्या खिशात गेला ते देखील पाहतो. जलजीवनच्या सर्व कामाची चौकशी करूनच घेतो, असे म्हणून पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढवले आहे.

रेल्वेचे प्रश्नांची माहिती असून नवीन आणि बंद झालेल्या गाड्या सुरू करण्याचे धोरण असणार आहे. तसेच नव्याने होत असलेल्या मालधक्क्यामुळे कोणालाही विस्थापित होण्याची वेळ येणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहू. पाटपाण्याच्या समस्येवर तोडगा काढणारच, असे खासदार वाकचौरे यांनी सांगून कामाचा झपाटा वाढवणार असल्याचे संकेत दिले.

"शेती, वीज, पाणी, उद्योग यांसह इतर प्रश्नांची आपल्याला जाण आहे. पश्चिम नद्याचे पाणी वळविण्याबरोबरच शेती बारामाही होण्यासाठी यापुढील काळात प्रयत्नशील राहू. तसेच शेतकऱ्यांना भारनियमन मुक्त करण्यासाठी सोलर वीज पंप मोफत देण्यासाठी आपला पहिला पाठपुरावा असणार आहे. खरीप लागवडीसाठी शेतकर्‍यांना 24 तास वीज मिळावी यासाठी पूर्ण ताकद लावू", असे खासदार वाकचौरे यांनी सांगितले. तसेच माझ्यावर टीका करण्यासाठी विरोधकांकडे काहीही नव्हते. खोटे-नाटे आरोप झाले. साईबाबा त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तसेच पश्चिम वाहिन्याचे पाणी आणण्याचे श्रेय माजी आमदार (कै.) दौलतराव पवार आणि आपलेच आहे, असे भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले.

आमदार लहू कानडे यांनी निवडणूक काळात आम्ही गाव न गाव पिंजून काढले. पदयात्रा केल्या. ही निवडणूक आमची आहे, असे समजून प्रत्येक कार्यकर्त्याने काम केले. त्यामुळे मतदारसंघात भाजपला सतत मिळणारे मताधिक् यावेळी कमी करण्यात यश मिळाल्याचे सांगितले. गेली दहा वर्षे खासदार म्हणून आम्हाला कोणतीच साथ मिळाली नाही. पण आता आमच्याबरोबर हक्काचे भाऊसाहेब आले आहेत, असेही आमदार कानडे यांनी सांगितले.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात महाविकास आघाडीतर्फे सत्कार झाला. आमदार लहू कानडे अध्यक्षस्थानी होते. अरुण नाईक, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ.वंदना मुरकुटे, कलीम कुरेशी, मुख्तार शहा, बाळासाहेब उंडे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT