Maratha Reservation Protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation News : बुरुडगाव ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय; सरपंच, उपसरपंचासह सर्व सदस्यांचा सामूहिक राजीनामा

Deepak Kulkarni

Ahmednagar News : आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, तर दुसरीकडे सरकारी पातळीवर अद्याप मराठा आरक्षणावर ठोस, असा निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.

ठिकठिकाणी आंदोलनं, मोर्चे, उपोषणं, कँडल मार्च अशा विविध मार्गाने सरकार विरोधातली धग कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील बुरुडगाव ग्रामपंचायतीने मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात उडी घेतली आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचासह सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातल्या बुरुडगाव ग्रामपंचायतीने (Burudgaon Gram Panchyat ) आता सामूहिक राजीनाम्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी गावातील सरपंच, उपसरपंचासह 11 पैकी तब्बल 9 सदस्यांनी आपला राजीनामा दिला आहे, तर उर्वरित दोन सदस्य सोमवारी राजीनामे देण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात असतानाच दुसरीकडे ग्रामपंचायत सदस्यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला जात आहे. आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनामुळे वातावरण चिघळलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बुरुडगाव ग्रामपंचायतीनेदेखील जरांगे पाटलांच्या लढाईला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीतील 11 पैकी 9 सदस्यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यात लोकनियुक्त सरपंचाचाही सहभाग आहे.

राजीनामा दिलेल्यांमध्ये सरपंच अर्चना कुलट, उपसरपंच महेश निमसे, सदस्य सिराज शेख, खंडू काळे, ज्योती कर्डिले, अक्षय चव्हाण, नयना दरंदले, शीतल ढमढेरे, रुख्मिणी जाधव, रंजना कुलट यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाचारणे आणि शालन क्षेत्रे हे दोन सदस्यदेखील सोमवारी राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.(Maratha Reservation)

तर बुरुडगावाने राजकीय नेत्यांना गावबंदीदेखील केली आहे. दरम्यान, बुरुडगावात रविवारी कँडल मार्चदेखील काढण्यात आला. या मार्चमध्ये लहानग्यांपासून महिला-पुरुषांनी सहभाग नोंदवला आहे.

राजीनामे देणाऱ्यांना जरांगे पाटलांचा सल्ला; म्हणाले,

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. यावर आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी भाष्य करतानाच सल्लाही दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले, आमदार आणि खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ नये. राजीनामे दिल्याने आपलीच संख्या कमी होणार आहे. त्यामुळे राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या. मुंबईत बसून सरकारला वेठीस धरा. राजीनामे देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे कूच करा. समाज तुम्हाला विसरणार नाही, असं जरांगे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT