Ram Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde News : आमच्या नादाला लागल्यास मोडल्याशिवाय राहत नाही... ; आमदार शिंदेंचे वक्तव्य चर्चेत

Bjp Mla Ram Shinde Big Statement : भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वक्तव्यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : "विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाल्यानंतर अनेकांनी आपली मजा पाहिली. परंतु, आपण परत आमदार झालो ते पाच नाही, तर सहा वर्षांसाठी. आमच्या नादाला कोणी लागले तर आम्ही त्यांचा नाद मोडल्याशिवाय राहत नाही," असा इशारा आमदार प्रा. राम शिंदे यांनी श्रीरामपुरातील बेलापुरात एका कार्यक्रमात कोणाचाही नामोल्लेख टाळत दिला. आमदार राम शिंदे यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.

बेलापुरातील लोकमाता अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनात आमदार प्रा. राम शिंदे बोलत होते. या वेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर कदम, आमदार लहू कानडे, काका कोयटे, सुरेश वाबळे, वासुदेव काळे, अशोक राशीनकर, सरपंच महेंद्र साळवी, सचिन गुजर, अरुण नाईक, रवींद्र खटोड, भरत साळुंके, साहेबराव वाबळे, सुनील मुथा, प्रकाश चित्ते उपस्थित होते.

समन्यायी पाणीवाटप कायदा आणि आताही दुष्काळी परिस्थितीत जायकवाडीला सोडण्यात आलेल्या पाण्याबाबत माजी आमदार मुरकुटे यांनी लक्ष वेधले असता, प्रा. शिंदे यांनी पाण्यावरून वरचे आणि खालचे असा संघर्ष सुरू आहे. आपण पालकमंत्री असताना आपल्या काळात हा कायदा झाला नाही. त्यामुळे कोणाच्या कालखंडात काय उद्योग झाले हे जनतेला माहीत असल्याची टीका त्यांनी केला. नगर जिल्हा विभाजनाचा प्रश्न खूप गाजला. आपण पालकमंत्री असतानाही जिल्हा विभाजनाचे समर्थन केले होते आणि आताही करत आहोतच. जिल्हा विभाजनाची सर्व प्रक्रिया झाली असून, केवळ घोषणा बाकी आहे, असे म्हणताच उपस्थितांमधून श्रीरामपूरच्या घोषणा देण्यात आल्या असता, आपण पालकमंत्री होतो, त्यावेळी मागितले नाही, आता आपण मंत्री पदावर नाही, असे सांगत त्यांनी या विषयाला बगल दिली. ( Ahmednagar Politics News )

प्रेमाखातर राष्ट्रवादीचाही प्रचार केला

माजी आमदार मुरकुटे आणि आपले मैत्रीचे संबंध आहेत. आता ते "बीआरएस"मध्ये गेले आणि त्यांनी पक्ष जिल्ह्यात आणला. त्यांच्या प्रेमाखातर एकदा श्रीरामपुरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचारही केल्याच्या आठवणींना प्रा. राम शिंदे यांनी उजाळा दिला.

Edited By Sachin Fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT