Sanjay Sawant-Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Lok Sabha Constituency : शिवसेनेचा गिरीश महाजनांना चिमटा; ‘पुन्हा तुमचा उमेदवार बदलू नका’

Shivsena Thackeray Group News : भारतीय जनता पक्षाने यंदा जळगाव लोकसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. स्मिता वाघ यांना 2019 मध्येही उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी राजकीय खेळी करीत महाजन यांनी उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली होती.

Sampat Devgire

Jalgaon, 24 March : जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना आपल्या कट्टर कार्यकर्त्याला उमेदवारी देणार आहे. आमची उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजपने आपला उमेदवार पुन्हा एकदा बदलू नये, या शब्दांत शिवसेना संपर्क नेते संजय सावंत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना चिमटा काढला आहे.

भारतीय जनता पक्षाने (BJP) यंदा जळगाव लोकसभा मतदारसंघातून (Jalgaon Lok Sabha Constituency) जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. स्मिता वाघ यांना २०१९ मध्येही उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी राजकीय खेळी करीत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली होती. हा संदर्भ देत शिवसेनेचे संपर्क नेते संजय सावंत यांनी भाजपच्या गिरीश महाजन यांना कोंडीत पकडले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीच्या जागावाटपात जळगाव मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेचे संपर्क नेते सावंत विविध भागात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहेत. विधानसभानिहाय बैठकाही घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसांत हे उमेदवार जाहीर करण्यात येतील, असे संकेत सावंत यांनी दिले.

जळगावमध्ये यंदा हमखास परिवर्तन होणार आहे, असा दावा सावंत यांनी केला. महाविकास आघाडी अतिशय ताकतीने यंदाच्या निवडणुकीत उतरली आहे. महायुती मात्र ४५ प्लस ची घोषणा करून आत्मविश्वास गमावल्यासारखे चाचपडत आहे. त्यामुळे त्यांना रोज नवे पक्ष जोडायचे आहेत. विरोधी पक्षांच्या विरोधात तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून कारवाई करायची आहे. दुसरीकडे आमच्यापुढे प्रतिस्पर्धी नाही, अशा पोकळ घोषणा करायच्या, यामध्ये भाजप अडकला आहे. मतदार भाजपवर प्रचंड संतापलेला आहे. मतदार या पक्षाला त्याच्या वाईट कामाचे फळ येत्या निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही, असेही सावंत म्हणाले.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे सध्या पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, ॲड ललिता पाटील, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आणि सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे चार उमेदवार इच्छुक आहेत. या उमेदवारांबाबत आढावा घेतल्यानंतर त्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आला आहे. याबाबत पक्षप्रमुख ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत उमेदवारीचा निर्णय घेणार आहेत.

Edited by : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT