Chandrashekhar Bavankule News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या नाशिक लोकसभा मतदारसंघांतील बूथ वॉरियर्सचे मेळावे घेणार आहेत. यानिमित्ताने भाजपने थेट लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याने सहयोगी घटक असलेल्या शिंदे गटात अस्वस्थता आहे. (Bavankule will attend all six assembly constituency booth warriors meeting)
नाशिकला (Nashik) उद्या (ता.२५) बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचे (BJP) विविध कार्यक्रम होत आहेत. यामध्ये बूथ वॉरियर्स घर घर चलो अभियानांतर्गत नागरिकांशी सुसंवाद आहे. यामध्ये शिंदे गट (Eknath Shinde) अथवा अन्य घटक नसतील.
नाशिक मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेले होते. त्यामुळे त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. अशा स्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचे विद्यमान खासदार म्हणून भाजप-शिंदे गटाची उमेदवारी त्यांना मिळेल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.
अशा स्थितीत राज्यभर एकनाथ शिंदे गटाच्या मतदारसंघांत भाजपने थेट निवडणुकीची तयारीच सुरू केली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघाचादेखील समावेश असल्याने शिंदे गटातील राजकीय अस्वस्थता लपून राहिलेली नाही. अशी स्थिती नाशिकमध्ये निर्माण झाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार बावनकुळे उद्या (ता. २५) नाशिक दौऱ्यावर आहेत. ते लोकसभा विजय अभियानांतर्गत हा दौरा करीत आहेत. यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे तीन विधानसभाअंतर्गत तीनशे बूथ वारिअर्सची बैठक होईल. त्यानंतर घर चलो अभियानांतर्गत ते नागरिकांशी संवाद साधतील. दुपारी तीनला शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांतील ३०० बूथ वॉरिअर्सचा मेळावा होईल. या वेळी ते लोकसभा महाविजय अभियानाची संकल्पना सादर करतील. त्यामुळे ही भाजपची थेट लोकसभेची स्वतंत्र तयारीच म्हणावी लागेल. त्यात कुठेही राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, एकनाथ शिंदे गटाला स्थान दिलेले नाही.
या वेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले हे आमदारदेखील स्वतंत्र मेळावे घेत शक्तिप्रदर्शन करतील. प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, बाळा भेगडे, समन्वयक गिरीश पालवे, केदा आहेर, प्रशांत जाधव, सुनील बच्छाव या दौऱ्याचे नियोजन करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.