Sanjay Pawar News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Pawar News : '' संजय पवारांकडून राजीनाम्याची स्टंटबाजी, मराठा समाजाची केली फसवणूक''; संचालक मंडळाचा आरोप!

संपत देवगिरे ः सरकारनामा

Manmad Agricultural Committee : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी सभापतिपदाचा राजीनामा देत आहे असे घोषित केले होते, परंतु आजपर्यंत त्यांनी राजीनामा दिलेला नाही. नाशिक जिल्हा उपनिबंधक कार्यालयात माजी आमदार पवार यांनी तूर्त राजीनामा दिलेला नाही.

खरंतर हा राजीनामा त्यांनी सकल मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी देत असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी राजीनामा न देता सकल मराठा समाजाची फसवणूक केलेली असल्याचे संचालक मंडळाने म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

२३ ऑक्टोबरला मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांची सभा सभापती यांनी बोलावली होती. संजय पवार यांनी सभापती या पदाचा गैरवापर करत कृषी उत्पन्न बाजार समिती लगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व गायकवाड वखारी लगतची जागा, बाजार समितीअंतर्गत असलेल्या काही जागा व बाजार समितीचे बिजलीघर इत्यादी मालमत्ता परस्पर विक्रीस काढल्यामुळे समितीचे नुकसान होत असल्याचे लक्षात आल्याने १८ पैकी १४ संचालकांनी गैरहजेरी लावून एक प्रकारे त्या सभेला विरोध केला होता.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार दि.२३ ऑक्टोबर २०२३ ची ही सभा कोरमअभावी तहकूब झाली, पण समितीच्या नियमाप्रमाणे तीन दिवसांनंतर दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी पुनश्च ही सभा घेण्यात आली व त्या सभेला आणि सभेच्या कामकाजास विरोध म्हणून दि.२५ ऑक्टोबर रोजी १२ संचालकांनी जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सचिवांकडे पत्र देऊन सदर सभेला गैरहजर राहून विरोध नोंदविला होता.

यानंतर २६ ऑक्टोबर रोजी सभापतिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करूनही प्रत्यक्षात १ नोव्हेंबरपर्यंत पवार यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिलेला नाही. दररोज बाजार समिती कार्यालयात पवार येतात व सभापती म्हणून कारभार चालवत असत. सभापती पवार यांच्या गैरकारभारामुळे १ नोव्हेंबर २०२३ रोजी १२ संचालकांनी त्यांच्या सह्यांचे अधिकार काढून घेण्यात यावे, यासंबंधी जिल्हा उपनिबंधक यांना स्वतः उपस्थित राहून पत्र दिलेले आहे. या पत्रासोबत जोडलेले आहे. असे सांगण्यात आले आहे.

सभापती संजय पवार यांनी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मतदारांचा एक प्रकारे विश्वासघात केलेला आहे. तसेच सर्व संचालकांनाही त्यांनी विश्वासात न घेता कामकाज चालवले होते. सकल मराठा समाजालाही त्यांनी एक प्रकारे फसवले आहे. तसे बघितले तर संजय पवार हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या जागेवरून निवडून आले आहेत. जर त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा द्यायचा होता, तर त्यांनी संचालक पदाचादेखील राजीनामा देणे अपेक्षित होते, असे संचालक मंडळाने म्हटले आहे.

(Edited By - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT