Uddhav thackeray Chandrashekhar Bawankule sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : 'सोनिया गांधींच्या दरबारात उद्धव ठाकरेंचा मुजरा', चंद्रशेखर बावनकुळेंची जहरी टीका

Loksabh Election : काँग्रेसच्या देशविघातक धोरणांवर टीका केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष संपले असून, ते मतांसाठी राजकारण करत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

Pradeep Pendhare

Nagar Loksabha : नगर जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेनंतर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष नगरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी प्रचारासाठी येताच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी Rahul Gandhi यांच्यावर तोफ डागली. 'उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्या दरबारात मुजरा लावला आहे', अशी घाणाघाती टीका बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष संपले असून ते मतांसाठी राजकारण करत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी म्हटले. सुजय विखे एकूण मतांच्या 65 टक्के मते घेऊन विजयी होतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, महेंद्र गंधे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'प्रभू श्रीरामलल्ला यांच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी उद्धव ठाकरेंना Uddhav Thackeray आणि काँग्रेसला भीती वाटली. प्रभू श्रीरामलल्ला प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला आपण गेलो तर मते वाया जातील. मतांचे राजकारण केले. एक विशिष्ट समाजाची मते मिळणार नाहीत. एवढी लपवाछपवी करतात. हिंदुत्त्ववादी भूमिकेपासून उद्धव ठाकरे दूर पळाले आहेत.' असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजमल कसाबला समर्थन करणे, पाकिस्तानच्या विषयाला फेव्हर करणे, अजमल कसाबच्या गोळीतून हेमंत करकरे यांची हत्या झाली नाही, असे म्हणणे. हे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? शहीदांचा अपमान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? अजूनही उद्धव ठाकरे बोलत नाही. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या विचाराशी सहमत झाले, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

पवार आणि ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार

शरद पवार यांच्या पक्ष विलीनीकरणाच्या मुद्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "शरद पवार साहेबांचा 1977 पासूनचा इतिहास, असा आहे की, जेव्हा ते कमजोर होतात, तेव्हा कोणाचाही हात पकडतात. मजबूत होतात, तेव्हा ते हात सोडतात. बारामती, पश्चिम महाराष्ट्र पवार यांच्या हातातून गेला आहे.काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण खरे बोलले आहे. महाराष्ट्रातील दोन पक्ष संपणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपणार आहे. त्यामुळे पक्ष विलीनीकरणाच्या गोष्टी करत आहेत.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT