Chandrashekhar Bawankule News : सुप्रिया सुळेंचा पराभव दिसतोय, म्हणून पवारांना विलीनीकरण सुचतंय! बावनकुळेंचा टोला

Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे भाकित शरद पवार यांनी एका मुलाखतीत वतर्वले आहे. त्यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे.
Sharad Pawar, Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar, Chandrashekhar BawankuleSarkarnama

Pune News : आगामी काळामध्ये काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar News) यांनी एका मुलाखती दरम्यान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आले असून विरोधकांकडून आगामी काळात शरद पवारांचा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी वक्तव्य केली जात आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे आज पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. (Lok Sabha election 2024)

Sharad Pawar, Chandrashekhar Bawankule
Ajit Pawar On Nilesh Lanke : अजितदादांनी लंकेना शिकवली निष्ठा; म्हणाले "एकदा निष्ठा ठेवली तर..."

बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असं वक्तव्य केलं आहे. कारण शरद पवार यांच्यासमोर पर्याय काही राहिलेला नाही. त्यामुळे ते असं बोलत आहेत. सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) पराभव होणार आहे. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चार जूनला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष पराभूत आणि निराश झालेले असतील. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्या प्रमाणे दोन पक्ष विलीनीकरण होणार किंवा संपणार आहेत. या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना विलीन होण्याशिवाय पर्याय नसणार आहे, असे बानवकुळे म्हणाले.

शरद पवार यांचा इतिहास पाहिल्यास त्यांनी कधी पक्ष विलीन केला तर कधी बाहेर काढला. जेव्हा शरद पवार यांना पुढे काही होऊ शकत नाही, असं वाटतं, तेव्हा त्यांची हीच भूमिका असते, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी भाजपला उत्तर भारतीयांना विरोध करणारे मनसे कशी चालते, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना दुःख आहे. मोदींना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. यापूर्वीच राज ठाकरे यांनी याबाबतची प्रत्येक भूमिका स्पष्ट केली असून भाजप हा कायम मराठी माणसाच्या पाठिशी असल्यास बावनकुळेंनी स्पष्ट केले.

Sharad Pawar, Chandrashekhar Bawankule
Prithviraj Chavan News : शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितले !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com