Narendra Darade & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Yeola APMC News : छगन भुजबळांनी नरेंद्र दराडेंना `झीरो` केले!

येवला बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संभाजीराजेंना झुकते माप, दराडेंना दिले नकार.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या येवला मतदारसंघात महाविकास आघाडीचे पॅनेल केले आहे. हे पॅनेल माघारीच्या दोन दिवस आधाची जाहीर होणार आहे. मात्र त्यात शिवसेनेच्या संभाजी पवार यांना ५ जागा देतानांच आमदार नरेंद्र दराडे यांच्याशी मात्र चर्चेलाही नकार दिला आहे. त्यामुळे भुजबळांच्या भूमिकेने शिवसेनेत दोन गट तयार झाल्याचे चित्र आहे. (Yeola APMC election may be one side for Chhagan Bhujbal)

दरम्यान १८ जागांसाठी निवडणूक (APMC election) होत आहे. त्यात शिवसेनेला (Shivsena) पाच जागा देण्यात येतील. अन्य पक्षांना एक-दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. उर्वरीत सर्व उमेदवार भुजबळ (Chhagan Bhujbal) समर्थक असतील. छगन भुजबळांच्या या आक्रमक खेळीने विरोधक मात्र गोंधळले आहेत. त्यांचे पॅनेल माघारीनंतरच तयार होण्याची शक्यता आहे.

येवला बाजार समितीच्या निवडणुकीत भुजबळ समर्थकांनी जिल्हा मजुर फेडरेशनच्या निवडणुकीचा वचपा काढल्याचे बोलले जाते. त्या निवडणुकीत आमदार नरेंद्र दराडे भुजबळांशी राजकीय सख्य करण्यास नकार दिला होता. त्यामुळे मजूर फेडरेशच्या निवडणुकीत आपसुकच संभाजीराजे पवार यांना भुजबळ गटाची मदत झाली होती.

बाजार समितीच्या निवडणुकीत भुजबळ गटाने तो वचपा काढला. त्यांनी दराडे नको ही स्पष्ट भूमिका घेतली. त्यामुळे संपर्कप्रमुक जयंत दिंडे यांनी दिलीप खैरे तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी चर्चा करून शिवसेनेच्या सर्वांनाच पक्ष म्हणून स्विकारावे अशी भूमिका घेतली होती. त्यात त्यांना यश आले नाही.

जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून येत्या वीस एप्रिलला माघारी आहे, त्यापार्श्‍वभूमीवर छगन भुजबळ यांनी आपल्या संपर्क कार्यालयात येवला, लासलगाव, नांदगाव, मनमाड येथील बाजार समितीतील निवडणुकीसाठी आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी त्यांनी निवडणुकीचा आढावा घेत सर्वाधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिले आहेत. तेच सर्व निर्मय घेतील असे सांगितले.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पॅनेल निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत सर्व निर्णय स्थानिक नेते निर्णय घेतील. येवला, लासलगाव, नांदगाव, मनमाड बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांशी देखील भुजबळ यांनी चर्चा करून मार्गदर्शन केले. सर्व मतदारांपर्यत शेतकरी हिताची केलेली कामे पोहोचवा व बाजार समितीवर पक्षाची सत्ता आणा अशा सूचना त्यांनी केल्या.

बैठकीत माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार मारोतराव पवार, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शिवसेना नेते संभाजीराजे पवार, सहकार नेते अंबादास बनकर, बाळासाहेब लोखंडे, राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, मोहन शेलार, वसंतराव पवार, साहेबराव मढवई, ज्ञानेश्वर शेवाळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान माणिकराव शिंदे आणि बाबा डमाळे हे भुजबळांच्या विरोधात पॅनेल करणार आहेत. त्यासाठी त्यांची चाचपणी सुरु आहे. आमदार दराडे यांनी मात्र निवडणुकीपासून दुर राहणार असल्याची भूमिका घेतल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT