Mahavikas Aghadi Pachora news: निधीच्या वल्गना करणाऱ्या शिंदे गटाने जागा विकली तेव्हा काय केले?

महाविकास आघाडीने शिंदे गटाच्या आमदारावर आरोप, बाजार समितीची जागा विकणारा शिंदे गट बाजार समितीचे काय हित साधणार?
NCP leader Dilip Wagh at Pachora meeting
NCP leader Dilip Wagh at Pachora meetingSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi panel news : महाविकास आघाडीने पॅनेल निर्मितीत आघाडी घेत एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना धक्का दिला आहे. बाजार समितीच्या जागेची विक्री करण्यात आली, तेव्हा हे सत्तेवर होते. त्यांनी तेव्हा काय केले?. सरकारकडून काय मदत आणली?. जागेची विक्री करणारे बाजार समिती आणि शेतकऱ्यांचे काय हित साधतील असा सवाल यावेळी करण्यात आला. (Mahavikas Aghadi taken lead in panel formation in Pachora APMC election)

पाचोरा - भडगाव (Jalgaon) कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक (APMC election) होत असून, या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व काँग्रेस (Congress) या तीनही पक्षांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पॅनल गठीत करून बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी वज्रमूठ आवळली.

NCP leader Dilip Wagh at Pachora meeting
APMC election politics : बाजार समित्यांतून दुसऱ्या हादऱ्याची भाजपची व्यूहरचना!

शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून शेतकरी, व्यापारी व संचालक मंडळ यांच्या त्रिवेणी संगमातून शेतकरी हित साधण्या सोबतच बाजार समितीला गतवैभव प्राप्त करून देणार असल्याचा निर्धार मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी केला. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी पॅनलचा मतदार मेळावा शनिवारी बोहरी फॉर्ममध्ये पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ अध्यक्षस्थानी होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच महाविकास आघाडी पॅनलचा जयघोष करत मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ, संजय वाघ, नानासाहेब देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, खलिल देशमुख, मोहन पाटील, सतीश चौधरी, विकास पाटील आदी नेते उपस्थित होते.

NCP leader Dilip Wagh at Pachora meeting
Nashik APMC news : देविदास पिंगळे यांच्या विरोधात दिनकर पाटील एकटे पडले?

पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या आघाडीच्या प्रमुखांनी विविध मुद्दे आपल्या भाषणात मांडले. शिवसेनेचे आमदार जागा विक्रीवर भाष्य करतात. मुख्यमंत्र्यांकडून कर्जफेडीसाठी पाच कोटी आणण्याचे पोकळ आश्वासन देतात. पैसाच आणायचा होता तर बाजार समितीची जागा विक्रीप्रसंगी ते सत्तेवर होते. त्यावेळी पैसा का आणला नाही? बाजार समितीवर कर्ज कोणी केले? सत्ता कोणाची होती? जागा विक्रीकडे दुर्लक्ष कोणी केले? असा प्रश्न यावेळी करण्यात आला.

हमाल मापारी व शेतकरी भवनासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, या वास्तू कोठे आहेत? शेतकऱ्याला काय सुविधा दिल्या? साधा शेतमाल ठेवायला व पाणी प्यायला जागा नाही, अशी टीका करण्यात आली. अरुण पाटील यांनी आमदारांवर टीका करत भाजप पुरस्कृत पॅनलचे शिंदे बाजार समिती जागेसंदर्भात एक शब्दही का बोलत नाहीत. कर्जफेडीचे पत्र आणले असल्याचे आमदार आता सांगतात. इतके दिवस ते होते कोठे? असे प्रश्न उपस्थित केले. नाना वाघ यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचलन केले. उद्धव मराठे यांनी आभार मानले.

NCP leader Dilip Wagh at Pachora meeting
Ajit Pawar News :''अजित पवारांनी आम्हांला सपोर्ट केला तर...'', शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य

पॅनल नेतृत्वाकडून प्रहार

याप्रसंगी पदम पाटील, हर्षल पाटील, गणेश परदेशी (भडगाव), सचिन सोमवंशी, अरुण पाटील, उत्तमराव महाजन, प्रदीप पवार, वैशाली सूर्यवंशी, दिलीप वाघ या मविआ पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुखांच्या मनोगतातून कृषी उत्पन्न बाजार समितीतील गतकाळात विकली गेलेली जागा, आणखी जागा विक्रीचा घातलेला घाट, बाजार समितीवर झालेले कर्ज, गतकाळातील अवाजवी खर्च, न्यायालयीन प्रक्रिया यांचा आढावा घेण्यात येऊन बाजार समितीतील स्वार्थी वृत्ती नष्ट करण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com