Nashik News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : नाशिकच्या शिक्षण विभागात पुन्हा लाचखोर पकडला...येवल्यात लिपिक जाळ्यात!

मागील महिन्यांत १० मे रोजी विस्तार अधिकाऱ्यांसह कंत्राटी कार्यक्रम अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते.

सरकारनामा ब्यूरो

Yewla Eduction Department News : नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागासह इतर शासकीय कार्यालयातील लाचखोरीच्या घटना व त्यावर होणारी चर्चा ताज्या असतानाच आज (ता. १६ जून) पुन्हा येवला येथील पंचायत समितीतील शिक्षण विभागात एक लाचखोर लिपिक लाच घेताना पकडला गेला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्र हादरले आहे. (Clerk was caught while accepting a bribe)

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिकाला दोन हजाराची लाच घेताना पकडले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराची येथून बदली झाली असून त्याला आवश्यक असलेले पत्र देण्यासाठी लिपिक ही रक्कम मागत होतात. प्रत्येक कामासाठी पैसे देणार कसे व कुठून हा प्रश्न शिक्षण क्षेत्रात होत आहे. याचमुळे वैतागलेल्या संबंधित कर्मचाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलून या लिपिकाला पकडून दिल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली आहे. लाचखोर लिपिकाला एलसीबीचे पथक चौकशीसाठी शासकीय विश्रामगृहावर घेऊन गेल्याचेही सांगण्यात आले असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

दरम्यान, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालवलकर यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आजच्या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यात लाचखोरावर कारवाईचं शतक पूर्ण झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, मागील महिन्यांत १० मे रोजी गाय गोठ्याच्या फायलीवर सही करण्यासाठी पंचायत समितीतील ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांसह कंत्राटी कार्यक्रम अधिकाऱ्याला लाच घेण्याचे मान्य केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. या घटनेला महिना उलटत नाही, तोच दुसरी घटना घडल्याने पंचायत समितीच्या कारभाराची ही चर्चा रंगत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT