Nashik Corporation, Shivsena, BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC News : नाशिक महापालिकेच्या आयुक्त पदावरून भाजप-शिंदे गटात रस्सीखेच !

BJP vs Shivsena : पालकमंत्री दादा भुसे पाठपुरावा करीत आहेत

संपत देवगिरे

Nashik NMC News : नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी कायमस्वरूपी नियुक्ती होताना दिसत नाही. परिणामी नाशिकचा कारभार राम भरोसे चाललेल्याची टीका होत आहे. कायमस्वरुपी आयुक्त नसल्याने महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. यामागे भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. भाजप व शिंदे गटाकडून आयुक्तांच्या नावावर अद्याप एकमत होत नाही. परिणामी अकरा दिवस उलटूनही नाशिकला आयुक्त मिळत नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, मागील वर्षी नाशिक महापालिकेच्या (NMC) आयुक्त पदावरून कैलास जाधव (Kailas Jadhav) यांची उचलबांगडी करण्यात आली. त्या पाठोपाठ मुंबई (Mumbai) महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांची नियुक्ती करण्यात आली. पवार हे जेमतेम तीन महिने या पदावर कार्यरत राहिले. त्यानंतर रस्ते विकास महामंडळाचे डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पुलकुंडवार यांना वर्ष होत नाही तोच साखर आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वास्तविक राज्यातील ठराविक महापालिकांमध्ये काम करण्यास अनेक आयएएस अधिकारी इच्छुक असतात. आयुक्तपदी बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग देखील केले जाते. मात्र नाशिक महापालिकेचे नियमित आयुक्तांची बदली होऊनही त्यांच्या जागेवर कायमस्वरूपी नियुक्ती केली जात नाही.

राज्यातील प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपल्या मर्जीतील अधिकारी बसविण्याची स्पर्धा शिवसेनेचा शिंदे गट (Shivsena) व भारतीय जनता पक्षात सुरू आहे. नाशिकसारख्या मोठ्या शहरावर आपल्या मर्जीतील अधिकारी बसण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत

फिल्मसिटीचे संचालक अविनाश ढाकणे, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रघुनाथ गावडे, राज्याचे ईएसआय आयुक्त अशोक करंजकर, सोलापूरचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या नावांची चर्चा आहे. खत्री यांच्या नावासाठी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचा आग्रह आहे. तर नाशिकच्या विद्यमान पालकमंत्र्यांकडून पवार नामक अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी आग्रह धरला जात असल्याची माहिती आहे.

भाजपचा हस्तक्षेप

भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या शिंदे गटाला पालकमंत्री पदे विभागून दिली आहे. ज्या पक्षाचा पालकमंत्री त्या जिल्ह्यात हस्तक्षेप करायचा नाही, असे सूत्र ठरले आहे. परंतु नाशिकच्या बाबतीत हस्तक्षेप होत असल्याने शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT