Ahmednagar Politic's : शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आज प्रमुख वृत्तपत्रांत जाहिरात देत 'राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे' या पद्धतीची जाहिरात करत याद्वारे राज्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने केलेल्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत, असे दर्शविण्याचा अटाकोट प्रयत्न केलेला आहे. या जाहिरातीनंतर एकूणच राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलेला असहे. भाजपबरोबरच विरोधी पक्षातील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलेली आहे. (Trying to tell Shinde group to be superior to BJP through survey : Rohit Pawar)
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी सांगितले की, कुठेतरी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट हा या सर्व्हेच्या माध्यमातून स्वतःला प्रमोट करताना दिसून येत आहे. गेल्या दहा दिवसांतील एकूण घडामोडी पाहिल्या, तर शिवसेना (Shivsena शिंदे गट) आणि भाजपमध्ये (BJP) काही ना काही वाद असल्याचं माध्यमातून दिसून येत आहे. या वादात वाढ होतानाच दिसत आहे.
सर्व्हेच्या माध्यमातून आता शिंदे गटाने आपली राज्यामध्ये सरशी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यामध्ये बीजेपीपेक्षाही शिंदे गट ताकदवान असल्याचे या जाहिरातीतून दाखवले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाला भारतीय जनता पक्षाची गरज नसून भाजपला शिंदे गटाची गरज आहे, हे शिवसेना शिंदे गटाने जाहिरातून दाखवल्याचं दिसतंय, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार रोहित पवार यांच्या कर्जत येथील 'दिनकर' या नूतन निवासस्थानाची तसेच कार्यालयाची आज (१३ जून) पूजा आयोजित करण्यात येणार आली आहे. या निमित्ताने आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि भाजपचे विधान परिषद आमदार राम शिंदे यांना आग्रहाचे जाहीर निमंत्रण दिले आहे. या पूजेच्या कार्यक्रमाच्या दरम्यान पत्रकारांशी बोलताना आमदार पवार यांनी शिंदेच्या या चर्चित जाहिरातीवर भाष्य केले.
सध्या आमदार राम शिंदे हे झारखंड दौऱ्यावर असून तेथील प्रभारी म्हणून भूमिका बजावत आहेत. त्यामुळे आज आमदार पवार यांच्या नूतन निवासस्थान आणि कार्यालयाच्या पूजेच्या निमित्ताने महसूल मंत्री विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील हे निमंत्रणाला मान देत येतात का आणि या प्रसंगी काही भाष्य करतात का या विषयी उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.