K. C. Padavi & Vijaykumar Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Vs BJP Politics : के. सी. पाडवी यांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल...

Congress Vs BJP Politics on Trible issues, K. C. Padvi criticized BJP-राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने आदिवासींची विकासकामे रोखण्याचे पाप केल्याने त्यांना धडा शिकवू, असे आव्हान काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांनी दिले.

Sampat Devgire

Congress Vs BJP on Trible issues : काँग्रेसचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडी सरकारने आदिवासी मतदारसंघात विकासकामे मंजूर केली. त्या कामांना विरोधकांचे मतदारसंघ म्हणून स्थगिती देण्याचे काम भाजपच्या ट्रिपल इंजिन सरकारने केला. आदिवासी जनता त्यांना धडा शिकवेल, या शब्दांत काँग्रेसचे नेते के. सी. पाडवी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. (K. C. Padvi said Court give us Justice on Devolopmental Works)

काँग्रेस (Congress) नेते के. सी. पाडवी यांनी नंदूरबार जिल्ह्यातील मतदारसंघातील कामांना भाजपच्या (BJP) ट्रिपल इंजिन सरकारवर गंभीर आरोप केला. या सरकारने आदिवासी मतदारसंघावर (Trible) अन्याय केला, तर न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसमध्ये नंदूरबार जिल्ह्यात संवाद यात्रा काढणार आहे. याबाबत त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सभा घेतली. या वेळी त्यांनी भाजपवर थेट हल्ला केला. येत्या निवडणुकीत आदिवासी जनता भाजपच्या महायुती सरकारला धडा शिकवील, असे ते म्हणाले. हा हल्ला अपरोक्षपणे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर मानला जातो.

या वेळी पाडवी म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने विरोधकांच्या मतदारसंघातील विकासकामांना स्थगिती देण्याचे पाप केले. मात्र, न्यायालयाने आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना न्याय दिला आहे. आदिवासींच्या विकासाच्या आड येणाऱ्या सरकारला आदिवासी बांधव धडा शिकवतील.

सध्याचे सरकार फक्त घोषणा करते. मात्र, विकासकामांच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याचेही त्यांनी सांगितले. सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या पालका चुलवळ सिसा ते कालीबेल, कालीवेल ते अस्तंबा, त्याच्यासोबत सुरवाणी ते जमाना, सिसा ते काकरपाटी या रस्त्यांच्या कामांना आमदार के. सी. पाडवी यांनी मंजुरी दिली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर दुर्गम भागातील या महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या कामाला आताच्या सरकारने स्थगिती दिली होती.

या भागातील दळणवळणाचा प्रश्न उभा राहिला होता. माजी मंत्री पाडवी यांनी सर्वोच्च न्यायालयातून या रस्त्यांच्या कामावरील स्थगिती उठविली होती. त्या कामांचा भूमिपूजन सोहळा झाला. या वेळी काँग्रेस पक्षातर्फे सभा घेण्यात आली. सभेला शेकडोंच्या संख्येने परिसरातील गावांतील कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT