Hiraman Khoskar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hiraman Khoskar will Resign? : ‘त्या’ इतिहासामुळे खोसकर काँग्रेस सोडताना दहा वेळा विचार करतील!

Sampat Devgire

Nashik News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासमवेत आणखी काही आमदार फुटण्याची शक्यता आहे, त्यात नाशिकच्या हिरामण खोसकर यांचे नाव घेतले जात आहे. आमदार खोसकर उद्या केनियाहून भारतात परततील. त्यावेळी त्यांची भूमिका स्पष्ट होईल. (Defecting MLA is defeated in Igatpuri)

आमदार हिरामण खोसकर काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार का? याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या राजकीय भवितव्याबाबत किमान दहा वेळा विचार करतील. त्यांच्या मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते अगदी निर्धास्त आहेत. त्यामागे कोणते कारण आहे?. खोसकर प्रतिनिधित्व करीत असलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात यापूर्वी असे घडले आहे. त्यात जो सत्तेच्यामागे धावतो, त्याची राजकीय कारकीर्द धोक्यात येते, असा इतिहास आहे.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या दोन्ही विचारधारेचे कार्यकर्ते सर्व भागात आहेत. या मतदारसंघात शिवसेनेने अतिशय सामान्य असलेल्या अनेकांना केवळ शिवसेना या पक्षाच्या नावावर आमदार केल्याचा इतिहास आहे.

या मतदारसंघात 2009 आणि 2014 या दोन निवडणुकांत माजी आमदार निर्मलाताई गावित काँग्रेस पक्षाच्या आमदार होत्या. मोठा जनसंपर्क आणि विकास कामांचा आवाका, यामुळे त्यांचा प्रत्येक आदिवासी पाडे आणि बहुजन समाजाशी संपर्क होता. अतिशय प्रबळ उमेदवार असूनही भारतीय जनता पक्षाने 2019 मध्ये जे फोडाफोडीचे राजकारण केले आणि चर्चा घडवली त्यातून गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

निर्मला गावीत यांचा मोठा जनसंपर्क आणि सर्व दृष्टीने सक्षम असूनही त्यांचा अतिशय मोठ्या फरकाने पराभव झाला होता. यावेळी अतिशय सामान्य पार्श्वभूमी असलेले हिरामण खोसकर फक्त काँग्रेस पक्ष आणि गावित यांनी केलेले पक्षांतर या दोनच कारणांमुळे विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात जो पक्षांतर करतो, तो पराभूत होतो, असा इतिहास आहे.

अशोक चव्हाण यांच्यासमवेत आणखी काही आमदार जातील, त्यात खोसकर असतील, असे आडाखे बांधले जात आहेत. मात्र, मतदारसंघातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या विषयावर निर्धास्त आहेत.

आमदार खोसकर पक्ष सोडणार नाहीत. कारण, त्यांनी तसे केले तर, इगतपुरी शिवाय अन्य मतदारसंघात त्यांना उमेदवारी करता येणार नाही. इगतपुरीमध्ये काँग्रेस पक्षाचे जे संघटन आहे, त्यामुळे खोसकर यांचे राजकीय भवितव्य संकटात आल्याशिवाय राहणार नाही, असा या नेत्यांचा ठाम विश्वास आहे.

जो पक्षांतर करतो, तो पराभूत होतो, हा इगतपुरी मतदारसंघातील राजकीय इतिहास आहे. त्यामुळे राज्यभरात खोसकर पक्षांतर करणार, असे बोलले जात असले, तरीही खोसकर यांना तसे करायचे झाल्यास त्यांना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT