Shivsena Agitation at Dhule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Shivsena News : देवेंद्र फडणवीस यांनी पदावर राहण्याचा अधिकार गमावला!

Sampat Devgire

Dhule Shivsena News : आरक्षणाच्या मागणीसाठी शांततापूर्ण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याचे कधीच ऐकले नव्हते. राज्यातील सरकारने हा अत्याचार करून दाखवला आहे. त्यामुळे केवळ माफी मागून चालणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत राहण्याचा अधिकार गमावला आहे, अशी टीका माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केली आहे. (Devendra Fadanvis should resigne due to lathicharged on Maratha agitation)

जालना येथील मराठा (Maratha) आंदोलक व नागिरकांवर (Police) बेछूट लाठीमार झाला. त्याच्या निषेधाचे लोण राज्यभर (Maharashtra) पसरले आहे. धुळे येथे शिवसेनेतर्फे (Shivsena) रास्ता रोको करण्यात आला.

मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलकांवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलनकर्ते रक्तबंबाळ होईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली. असा अत्याचार करणाऱ्या सरकारने तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उबाठा), युवासेनेच्या आंदोलकांनी केली.

या प्रश्नावर धुळ्यात निषेध आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हल्ल्याचा निषेध केला.

आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते. लोकशाहीत प्रत्येक नागरिकास त्याच्या न्याय हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने मोर्चे अथवा आंदोलने करता येतात. मराठा समाजाने जालना येथे काढलेल्या शांततापूर्ण मोर्चावर सरकारच्या आदेशाने अमानुष लाठीमार करून मराठा समाजाच्या बांधवांना गंभीर जखमी करण्यात आले. संपूर्ण लोकशाही पायदळी तुडवून हुकूमशाही आणू पाहणाऱ्या भाजपच्या केंद्र व राज्य सरकारमधील मोदी, शहा तसेच फडणवीस हे हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचे शहराध्यक्ष, माजी आमदार प्रा. पाटील यांनी यावेळी सांगितले.

भारतातील व पुरोगामी महाराष्ट्रातील नागरिकांचे न्याय हक्क सत्तेचा गैरवापर करून पायदळी तुडवून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिवसेना (उबाठा), युवासेनेने म्हटले आहे. मराठा समाजाच्या बंधू-भगिनींवर झालेल्या लाठीमाराबद्दल फडणवीस व भाजप सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, प्रायश्चित्त म्हणून तात्काळ राजीनामे द्यावे अशी मागणी धुळे जिल्हा युवासेनेने केली.

धुळे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील, ललित माळी, भरत मोरे, कैलास पाटील, संदीप सूर्यवंशी, दिनेश पाटील, कैलास मराठे, छोटू माळी, ॲड. विवेक सूर्यवंशी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हरीश माळी, उपजिल्हाप्रमुख कुणाल काणकाटे, महानगरप्रमुख सिद्धार्थ करनकाळ, मनोज जाधव, विधानसभाप्रमुख योगेश मराठे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT