Abdur Rehman, Pratap Dighavkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election : निवडणुकीच्या मैदानात प्रथमच झुंजणार दोन माजी IPS अधिकारी

IPS offiers in Election : महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात सनदी अधिकाऱ्यांची होणार लढत

Arvind Jadhav

Dhule Political News :

धुळे मतदारसंघाची चुरस दिवसागणिक वाढत आहे. ही लढत काँग्रेस आणि भाजप अशी सरळ होईल की, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे ही जागा खेचून आणतील, असे काही प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. मात्र, धुळे लोकसभा मतदारसंघात प्रथमच दोन माजी आयपीएस अधिकारी समोरासमोर येण्याची शक्यता आहे. यामुळे मतदारांची उत्सुकतासुद्धा शिगेला पोहोचली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात दोन सेवानिवृत्त सनदी अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात समोरासमोर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत वेगळी असेल. म्हणूनच केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.

यातील पहिले IPS अधिकारी आहेत अब्दुर रहमान (Abdur Rehman). केंद्र सरकारने २०१९ मध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधयेक मंजूर केल्यानंतर त्याविरोधात रहमान यांनी पदाचा राजीनामा दिला होता. 1997 च्या बॅचचे अब्दुर रहमान त्यावेळी मानवी हक्क आयोगाच्या महानिरीक्षकपदी होते. केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात रहमान गेल्याने ते त्यावेळी खूप चर्चेत आले. यानंतर त्यांनी मुस्लिमधर्मीयांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी, तसेच अन्य काही सामाजिक कामांसाठी रहमान यांचे धुळ्यात येणे-जाणे वाढले आहे.

धुळे शहर (Dhule) आणि मालेगाव (Malegaon) शहर अशा घनदाट लोकसंख्येच्या विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे आमदार प्रतिनिधित्व करतात. तसेच, धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. धुळे येथे एका सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या रहमान यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, काँग्रेसची (Congress) विभागीय लोकसभा निवडणूक आढावा बैठक शनिवारी (दि. 27 जानेवारी) धुळ्यात झाली. यावेळी नाशिक विभागातील सर्व आठ लोकसभा मतदारसंघांबाबत आढावा घेण्यात आला. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी हजर होते. बैठकीत धुळे लोकसभा मतदारसंघासाठी शामकांत सनेर (धुळे), डॉ. तुषार शेवाळे, आ. कुणाल पाटील यांच्यासह रहमान यांच्या नावाची चर्चा झाली. थेट केंद्र सरकारला विरोध करून मुस्लिम समाजासाठी सुरू केलेले समाजकार्य लक्षात घेता रहमान काँग्रेससाठी चांगला पर्याय ठरू शकतात.

दरम्यान, भाजपाच्या (BJP) बाजूने माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर (Pratap Dighavkar) निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी निवृत्तीनंतर लागलीच पक्षप्रवेश केला. मात्र, लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) अप्रत्यक्ष सुरुवात त्यांनी पोलिस सेवेत असतानाच सुरू केली होती. निवृत्तीच्या जवळ आलेले असताना उत्तर महाराष्ट्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

नाशिकसह धुळे जिल्ह्यातील शेतकरी नगदी पिके घेतात. देशभरात हा माल जातो. मात्र, अनेकदा शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होते. वर्षानुवर्षे पैसे मिळत नाही. मिळाले तर कमी किंवा मिळतच नाही, अशी स्थिती असते. शेतकऱ्यांची हीच स्थिती ओळखून दिघावकर यांनी विशेष मोहीम हाती घेतली. नाशिकसह धुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये दिघावकर यांनी परत मिळवून दिले.

मूळ नाशिक जिल्ह्याचे असलेल्या दिघावकरांचे धुळे मतदारसंघाशी नाते जुळले गेले. जर या दोघा आयपीएस अधिकाऱ्यांना पक्षाने उमेदवारी दिली, तर राज्यातच नव्हे, तर देशाच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला जाईल. लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच दोन माजी आयपीएस अधिकारी उघड उघड एकमेकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील.

(Edited by Avinash Chandane)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT