Nashik Politics : आघाडीची गाडी नाशिकमध्ये अडलेलीच तर; दिंडोरीत सापडेना पर्याय

Mahayuti Vs MVA : शरद पवारांचे चार शिलेंदारांची दिंडोरीतून लढण्याची इच्छा
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : महाआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचा दावा सातत्याने करण्यात येतो आहे. मात्र, नाशिकसह कोल्हापूर, रायगड आणि हिंगोली या लोकसभा मतदारसंघावर महाआघाडीतील दोन-तीन घटकपक्षांनी दावा केल्याने अद्याप तोडगा निघालेला नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाला, हे स्पष्ट नसताना दिंडोरीत भाजपाच्या भारती पवार यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार शोधण्याचे महाआघाडीचे काम अद्याप संपलेले नाही. 30 जानेवारी रोजी जागावाटपाबाबत बैठक होणार असून, त्यातून काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाआघाडीत नाशिक शिवसेनेला (ठाकरे) तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला (शरद पवार) मिळाल्याचा दावा केला जातो आहे. मात्र, दिंडोरीसाठी पवारांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. मतदारसंघातील जवळपास चार इच्छूक उमेदवारांसोबत शरद पवारांनी चर्चा केली. मात्र, त्यातील एकालाही अद्याप हिरवा कंदिल दर्शवला नाही.

दिंडोरीचे प्रतिनिधीत्व केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार करतात. हा मतदारसंघ भाजपाचा असून, त्यांचे सहकारी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या येथे दावा करण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे उपलब्ध पर्यांयापैकी एका उमेदवाराची निवड करणे, पवारांना क्रमप्राप्त होणार आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Teachers Transfer : नगरमधील 118 गुरुजी कायद्याच्या कचाट्यात! काय आहे प्रकरण ?

शरद पवार (Sharad Pawar) गटाचे भास्कर भगरे, ठाकरे गटाचे रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर अशी काही नावे पवारांसमोर आहेत. यातील चारोस्करांना पसंती दिल्यास पक्षाचा आणि जागेचा प्रश्न उद्भवतो. भाजपासाठीही भारती पवारांनाच उमेदवारी देताना अनेक आव्हाने पुढे येणार आहेत. यातूनच की काय पण मागील दोन-चार दिवसांपासून विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ लोकसभेसाठी इच्छूक असल्याची चर्चा सुरू झाली. अर्थात याची जाहीर कबुली कोणी दिलेली नसली तरी झिरवाळांनी तयारी केली तर त्यांना भाजपकडूनच उमेदवारी करावी लागेल, हे स्पष्ट आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Gunratna Sadavarte : मनसेने सदावर्तेंवरील उपचारांसाठी घेतली डॉक्टरांची वेळ

भाजपचे (BJP) प्रदेश सरचिटणीस एन. डी. गावीत हे सुद्धा निवडणुकीसाठी तयार आहेत. आमदारकीची संधी गेल्यापासून ते पक्षाकडे आस लावून आहेत. आमदार नितीन पवार यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांच्याकडे विरोधी पक्ष पोहचले. मात्र, त्यांनाही भाजपकडून संधीची प्रतिक्षा आहे. भारती पवार यांना कांदा निर्यादबंदी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे सध्यातरी जागा कोणाला सुटते, यावर पुढील राजकीय डावपेच ठरतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, जागा वाटपात नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यापैकी कोण बाजी मारते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येथे या दोन्ही गटातील कार्यकर्ते, इच्छूक उमेदवार निवडणुकीसाठी तयारीतच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे लक्ष महाआघाडीच्या उद्याच्या बैठकीकडे लागले असून, तत्पूर्वी जागा आमचीच, असा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येतो आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Pune BJP News : भाजप शहराध्यक्षांनी बोलून दाखवली खंत; म्हणाले,'आम्हाला काहीच अधिकार नाही...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com