Saroj Ahires, Girish Mahajan, Rajashri Ahirrao  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Saroj Ahire Vs Rajashri Ahirrao : दोघींचा सवतासुभा त्यात गिरीश महाजनांचा वेगळाच दावा...

सरकारनामा ब्यूरो

Nashik : भाजपमध्ये विरोधी पक्षातील उमेदवारांची इनकमिंग जोरदार सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघ निहाय प्रस्थापीत आमदारांमध्ये चलबिचल तर विरोधी पक्षांतील दुसऱ्या फळीतील इच्छुकांना संधी अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपच्या या धोरणामुळे आजमितीस देवळाली मतदार संघातील चुरस टोकाची वाढली. राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे आणि माजी तहसीलदार राजश्री आहिरराव यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते जगजाहीर आहे. त्यात ग्रामविकास मंत्र्यांनी तिकीटाचा वादा कोणालाही केला नसल्याचे सांगितले. दोघींचा सवतासुभा आणि त्यात महाजनांकडून करण्यात आलेला दावा, याचीच चर्चा सध्या सुरू आहे.

देवळाली मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षाच्या (अजित पवार गट) आमदार सरोज अहिरे यांना सुरूवातीच्या काळात दिशा देण्याचे काम भाजपानेच केले. मात्र ऐनवेळी जागा वाटपात भाजपला माघार घ्यावी लागली अन देवळली विधानसभेसाठी शिवसेना अन राष्ट्रवादी अशी लढत झाली. भाजपाने तयार केलेल्या विजय मार्गावर राष्ट्रवादीचे घड्याळ जोरात फिरले. आमदार अहिरे विजयी झाल्यात. मात्र, यानंतर तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या राजश्री आहिरराव यांनी अहिरे यांच्यासमोर आव्हान उभे केले.

दोन्ही बाजुंनी हा वाद इतका वाढला की आहिरराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अहिरे यांच्याविरोधात उघड लढण्याचा निर्णय घेतला. यासाठी भाजपही तयारच असल्याने आहिरराव यांचा पक्षप्रवेशही पार पडला. मात्र, आपण कोणालाही उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले नसल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

देवळाली मतदार संघात अजित पवार गटाच्या आमदार असल्याने महाजन यांनी वरकरणी असे म्हटले असले तरी भाजपाचा देवळाली मतदार संघातील रस लपून राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीतील निकाल त्यातील मतांची विभागणी आणि पक्षाला झालेले मतदान असे निष्कर्ष विधानसभेवेळी लावलेही जातील. मात्र, तोपर्यंत गटागटांमधील चुरस कायम राहणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक पश्चिम मतदार संघातही अशीच स्थिती

पश्चिम विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व भाजपच्या सीमा हिरे करतात. याच मतदार संघासाठी इच्छुक असलेल्या सोनाली राजे पवार आणि काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. छत्रपती उदयनराजे भोसले हे सोनाली राजे पवार यांच्या मागे उभे असून गतवेळी त्यांनी पवार यांच्यासाठी प्रयत्न केला होता. अश्विनी बोरस्ते यांचेही नाव इच्छुकांमध्ये येते. यामुळे पश्चिममधील चुरस वाढली आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT