Dinkar Patil Vs Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dinkar Patil Vs Hemant Godse News : 'माझ्यासमोर उभा राहू नकोस बाजुला हो, नाही तर..' ; दिनकर पाटलांचा हेमंत गोडसेंना इशारा!

Arvind Jadhav

Nashik Political News : 'माझ्यासमोर उभा राहू नको, आडवाच करीन', अशा शब्दांत भाजपाचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना सुनावले. यावेळी उपस्थित भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हसण्यावरी नेत हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. दिनकर पाटील यांनी सुरूवातीपासूनच गोडसे यांना टार्गेट केले असून, हा वाद वाढू नये, यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनाही मध्यस्थी करावी लागली.

नाशिक येथे रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) नाशिक दौऱ्यावर आलेले असताना हा प्रकार घडला. दानवे यांच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह खासदार हेमंत गोडसे हॉटेल ताज येथे एकत्र आले होते. फोटो काढण्यासाठी दोघे पुढे सरसावले असता पाटील यांनी खासदार गोडसे यांना चॅलेंज केले. महायुतीत नेमंक काय सुरू आहे, असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे(Hemant Godse) असून, भाजपने या जागेवर दावा सांगितला आहे. अद्याप मतदारसंघ कोणाला मिळणार हे स्पष्ट नाही. मात्र दोन्ही बाजुने इच्छुकांची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दिनकर पाटील यांनी तर खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीकास्त्र सोडून लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे.

महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील(Dinkar Patil) हे भाजपकडून इच्छुक असून, आतापर्यंत मतदारसंघात विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत त्यांनी प्रचारात लीड घेतला आहे. रावसाहेब दानवे यांच्या दौऱ्यावेळी गोडसे आणि पाटील दोघे समोरासमोर आले. दानवे यांचे स्वागत करताना पाटील यांनी समोर असलेल्या खासदार गोडसे यांना 'माझ्यासमोर उभा राहू नकोस बाजुला हो, नाही तर आडवा करीन.' असे म्हटले.

हा वाद वाढू नये यासाठी दानवे यांनी मध्यस्थी करीत तुमचा वाद मिटवयाला मला पुन्हा यावे लागेल, असे म्हटले. खासदार हेमंत गोडसे हे तिसऱ्या टर्मसाठी तयारीत आहे. दोन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा गाठलेल्या गोडसे यांना यावेळी महायुती कायम राहूनही जागा शिवसेनेला मिळेल, याची अपेक्षा आहे. तर, नाशिकवर भाजपचा झेंडा फडकवण्याची तयारी सुरू आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत नाशिक कोणाचे यावर निर्णय समोर येण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT