Heena Gavit, Vijaykumar Gavit  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Heena Gavit : 'जल जीवन'च्या माध्यमातून विरोधकांचे पुन्हा 'मिशन गावित'

Gavit Family Was Surrounded by the Opposition : महायुतीच्या नेत्यांनीही भाजपच्या डॉ हीना गावित यांच्या विरोधात उपसले राजकारणास्त्र. आता पुन्हा नंदुरबारचे सर्वच राजकीय पक्ष गावित यांच्या विरोधात एकत्र आले आहेत.

Sampat Devgire

Padvi Vs Gavit News : लोकसभा निवडणुकीत भाजप नेते डॉ विजयकुमार गावित यांना विरोधकांनी घेरले होते. आता पुन्हा नंदुरबारचे सर्वच राजकीय पक्ष गावित यांच्या विरोधात एकत्र आले आहेत.

नंदुरबार जिल्हा आणि भाजप नेते डॉक्टर विजयकुमार गावित कुटुंबीय हे एक राजकीय समीकरण आहे. बहुतांशी सत्ता पदे गावित कुटुंबीयांकडे आहे. त्यामुळे नंदुरबारच्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांचीही गावित कुटुंबीयांच्या विरोधात युती झाली आहे.

यासंदर्भात शासनाच्या जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून विरोधकांनी मिशन गावित हाती घेतले आहे. या योजनेतील कामाची गुणवत्ता आणि आर्थिक गैरव्यवहार या विरोधात आंदोलन करीत गावित कुटुंबाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याला माजी खासदार डॉ हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित (Supriya Gavit) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

यानिमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावित विरुद्ध विरोधक असे राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे महायुतीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट (Shivsena Eknath Shinde Group) देखील विरोधकांच्या तंबूत सामील झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गावित कुटुंबीयांना एकटे पाडण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे संशयास्पद आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या सर्व कामांची चौकशी करावी. कामांची गुणवत्ता सिद्ध होईपर्यंत कंत्राटदारांना त्यांचे पैसे अदा करू नयेत.

या कामांचे अनेक कंत्राटदार पळून गेले आहेत. त्यामुळे यातील अनेक कामे अर्धवट सोडून दिली आहेत. या गावित (Heena Gavit) यांची दुखरी नस असलेल्या या मागण्या विरोधकांनी केल्या आहेत. या चौकशीत जिल्हा परिषदेची सत्ता असलेले आणि पालकमंत्री अशा दोन्ही सत्ता असलेल्या गावित यांची चांगलीच कोंडी होऊ शकते.

माजी मंत्री के. सी. पाडवी, खासदार गोवाल पाडवी, आमदार शिरीष कुमार नाईक, माजी आमदार उदयसिंग पाडवी, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे, जयपाल सिंग रावल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ अभिजीत मोरे आदीविविध पक्षांचे नेते या आंदोलनात एकत्र आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT