ED Raid Shirdi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Shirdi Case : शिर्डीतील युवा उद्योजक टार्गेटवर! अशोक खरात प्रकरणात ‘ईडी’ची मोठी कारवाई

ED conducts raids on star hotel and residence of a young entrepreneur in Shirdi, linked to Ashok Kharat network in Ahilyanagar district : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचा अनुयायी असलेला शिर्डीमधील युवा उद्योजकावर ईडीने छापा घातल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Ashok Kharat case : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात, 'ED'ने कारवाईचा फास आवळला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमधील युवा उद्योजकाच्या तारांकित हाॅटेलवर आणि निवासस्थानावर 'ED'ने छापा घातला.

दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा घातल्याने चांगलीच खळबळ उडाली. लॅपटाॅप, हार्डडिक्स, लाॅकरमील दस्तऐवजाची पडताळणी केली. या मुळे 'ED'च्या छाप्याची जोरदार चर्चा आहे.

शिर्डीमधील हा युवा उद्योजक अशोक खरात (Ashok Kharat) याचा अनुयायी आहे. खरात याला अटक होण्यापूर्वी, याच हाॅटेलवर तीन बड्या सरकारी अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. तसंच याच हाॅटेलवर सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच्या गुप्त आर्थिक बैठका होत होत्या. त्यामुळे 'ED'च्या या कारवाईची चर्चा आहे.

'ED'च्या अधिकाऱ्यांनी शिर्डीतील (Shirdi) या युवा उद्योजकाच्या कोपरगावमधील निवासस्थानी आणि शिर्डीमधील सन अ‍ॅण्ड सन रस्त्यावरील तारांकित हाॅटेलवर एकाच वेळी छापा घातला. या वेळी 'ED' अधिकाऱ्यांबरोबर शस्त्रधारी होते. 'ED' अधिकाऱ्यांनी हाॅटेलमध्ये प्रवेश करताच, अकाऊंट रूम, मालकाची रूम ताब्यात घेतली.

'ED' अधिकाऱ्यांनी मालकाचा लॅपटाॅप, हार्डडिक्स, लाॅकरमधील दस्तऐवज यांची पडताळणी केली. या छाप्यात 'ED'ने हाॅटेलमधील सर्व खोल्या ताब्यात घेतल्या होत्या. सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हाॅटेलमध्ये 'ED' अधिकाऱ्यांची कारवाई सुरू होती.

अशोक खरात याचे राज्यभर अनुयायी आहे. या अनुयायांमार्फत अनेक ठिकाणी खरात याने गुंतवणूक केली आहे. याची माहिती 'ED'ला प्राप्त झाली आहे. SIT देखील यात तपास करत आहे. संबंधित प्रकरणाशी निगडीत पुरावे गोळा करत आहे.

काका कोयटे यांचा राजीनामा चर्चेत.....

अशोक खरात याचे आर्थिक व्यवहार काही संस्थांमार्फत सुरू होते. त्याची देखील चौकशी होत आहे. या कारवाईवेळीच राज्य पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भोंदू अशोक खरात याचे समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत बनावट खाते उघडून आर्थिक व्यवहार केले आहेत. या पार्श्वभूमीवर कोयटे यांनी दिलेला राजीनामा चर्चेचा विषय ठरला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT