Ashok Kharat Case : शिर्डी पोलिस 'ॲक्शन मोड'वर! बेकायदेशीर सावकारकी प्रकरणी खरातच्या अडचणीत वाढ; पोलिसांचा ताब्यासाठी न्यायालयात अर्ज

Shirdi police seek custody of Kharat in court: शिर्डी पोलिसांनी बेकायदेशीर सावकारकीविरोधात कारवाई तीव्र केली असून खरात यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिसांनी ताब्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
Ashok Kharat Life Threat? SIT in Action Mode, Court Grants Permission
Ashok Kharat Life Threat? SIT in Action Mode, Court Grants PermissionSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat illegal moneylending case in Shirdi: भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात बेकायदेशीर सावकारकीच्या आणि जमीन व्यवहारातील फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यात, चौकशीसाठी ताबा मिळावा यासाठी शिर्डी पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे.

शिर्डीतील बेकायदेशीर सावकारी आणि जमीन व्यवहारातील फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यात नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचा चौकशीसाठी ताबा मिळावा, यासाठी शिर्डी पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

तसेच याच गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी पसार असलेली खरात याची पत्नी कल्पना हिने सत्र न्यायालयात वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर उद्या दहा एप्रिलला सुनावणी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

Ashok Kharat Life Threat? SIT in Action Mode, Court Grants Permission
Kej Tehsildar Accident : बीड जिल्ह्यातील तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती मृत्यू; लातूर-अंबाजोगाई मार्गावर भीषण दुर्घटना

शिर्डीत अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरुद्ध बेकायदेशीर सावकारी आणि जमीन व्यवहारातील फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी अशोक खरात याचा शिर्डी पोलिसांना ताबा हवा आहे. या गुन्ह्यातील अरविंद बावके आणि किरण सोनवणे या दोघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याच गुन्ह्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात आरोपी असून त्यांची चौकशी होणार आहे. परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात ही पसार आहे. तिच्या विरोधात पोलिसांनी लूक आउट नोटीस जारी केली आहे. याच दरम्यान कल्पना खरात हिने वकिलामार्फत सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. तिच्या जामीन अर्जावर उद्या दहा एप्रिलला सुनावणी होणार आहे.

अशोक खरात याची भोंदूगिरी आणि व्यवहाराचं सर्व अधिक ठिकाणी हे शिर्डी असल्याचं समोर येत आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिर्डी शाखेतील त्याच्या भक्तांचे नावाने असलेले खाते. परंतु वारसदार म्हणून अशोक खरात याचे असलेले नाव आणि मोबाईल क्रमांक खात्यांना दिले आहेत.

ही खाते अशोक खरात याने आपल्या अंधभक्तांच्या नावे खोललेली आहेत. अशोक खरातच्या या बनावटगिरीमध्ये त्याने त्याचेच शेकडो अंधभक्त अडकले आहेत. यात पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं पोलिस तपासून समोर येत आहे.

एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ माजी महिला पदाधिकाऱ्याची बहीण आणि पुतण्या या दोघांची, समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये बनावट खाते असून ह्या दोघांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून समजली. ह्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Life Threat? SIT in Action Mode, Court Grants Permission
Nashik Crime : आठ महिलांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव! तब्बल चार वर्ष अत्याचार, पोलिसही हादरले!

तसंच यामध्ये दोन परिवहन विभागातील दोन सहायक अधिकारी, खरात याच्या कुटुंबातील बहीण आणि भाच्यासह नाशिकमधील वैद्यकीय व्यावसायिक पती-पत्नीचे नावे देखील दोन खाते समता नागरी पतसंस्थेच्या शिर्डी शाखेत असल्याचे तपासात समोर आले आहे. या सर्व खातेदारांची चौकशी करून त्यांची लेखी जबाब नोंदविण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com