Raksha khadse, Eknath khadse, rohini khadse  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raver Loksabha Constituency: 'रावेर'बाबत एकनाथ खडसेंची मोठी घोषणा; 'हे' कारण देत निवडणूक लढवण्यास नकार

Eknath Khadse On Raver Loksabha Election : रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसंदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.14) नाशिक येथे प्रदीर्घकाळ चर्चा सुरू होती. या वेळी एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे दोघेही उपस्थित होते.

Sampat Devgire

Eknath Khadse News: रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाकडून रोहिणी खडसे यांची उमेदवारी अपेक्षित होती. मात्र, आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या घोषणेमुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील गटनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून आपण स्वतः किंवा पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या उमेदवार नसतील अशी घोषणा केली. या गोष्टीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघातील राजकारण बदलणार आहे. हा महाविकास आघाडीसाठीदेखील एक धक्का मानला जातो. त्यामुळे खडसे यांच्या निर्णयाने खळबळ उडाली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसंदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काल नाशिक येथे प्रदीर्घकाळ चर्चा सुरू होती. या वेळी एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे दोघेही उपस्थित होते. एकनाथ खडसे रावेर मतदारसंघातून उमेदवारी करतील, असे अपेक्षित होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी नकार दिला आहे. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी उमेदवारी करावी, असा पक्षाच्या नेत्यांचा आग्रह होता. तसा संदेशदेखील गेला होता. मात्र, आज खडसे यांनी केलेल्या घोषणामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.

रावेर मतदारसंघातून सहा ते सात उमेदवार इच्छुक आहेत. यातील तीन उमेदवारांची स्क्रीनिंग केली जात आहे. त्यानंतर त्यातून अधिक पात्र उमेदवाराची निवड होऊ शकेल. उद्या सायंकाळपर्यंत पक्षाकडून याबाबतचा निर्णय होईल. त्यानंतर रावेर मतदारसंघातील लढत स्पष्ट होईल. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरली आहे. रावेर मतदारसंघातून यंदा आमचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीत मतदार राज्य व केंद्रातील सरकारवर नाराज आहेत. विशेषतः शेतकरी वर्गात नाराजीची लाट असल्याने राज्य व केंद्रातील सरकार विरोधात मतदान होणार आहे. महाविकास आघाडीने सर्व 48 मतदारसंघांचे जागावाटप आणि उमेदवारबाबतची तयारी केली आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबतची घोषणा होईल, असा विश्वासदेखील खडसे यांनी या वेळी व्यक्त केला.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT