Shiv Sena MLA News : एकनाथ शिंदेंचे 12 आमदार 'मातोश्री'ला शरण जाणार? ठाकरेंच्या वकिलाचा खळबळजनक दावा!

Eknath Shinde Vs Uddhav Thackerya : उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी थेट परतणाऱ्या आमदारांचीच नावेच घेऊन केला मोठा दावा...
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील 12 आमदारांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी होणार असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेची न्यायालयीन लढाई लढणारे अॅड. असीम सरोदे यांनी चंद्रपुरातील 'निर्भय बनो’च्या सभेमध्ये केला आहे. सरोदे यांच्या दाव्यामुळे सध्या राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून, हे आमदार खरंच ठाकरेंकडे जाणार का? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. (Latest Marathi News)

एकीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकींच्या तारखा आयोगाकडून उद्या जाहीर करण्यात येणार आहेत. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपने आपल्या 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, अद्याप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीकडून किती जागा सोडल्या जातील, याबाबतची माहिती अजूनही समोर आलेली नाही.

((राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Lok Sabha Election 2024 News : रावेर लोकसभेसाठी बारामती पॅटर्न; खडसे नणंद-भावजयीत लढतीची शक्यता

शिवाय भाजपमधील वरिष्ठांसमोर शिंदेंचं काहीच चालणार नसल्याची टीका विरोधक करत आहेत. त्यामुळे शिंदेंच्या आमदार आणि खासदारांमध्ये नाराजी असल्याचंही बोललं जात आहे. याच नाराजीमुळे शिंदेंचे काही आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी करणार असल्याचा दावा अॅड. सरोदे यांनी केला आहे. सरोदे यांच्या दाव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

शिवाय भाजपमधील वरिष्ठांसमोर शिंदेंचं काहीच चालणार नसल्याची टीका विरोधक करत आहेत. त्यामुळे शिंदेंच्या आमदार आणि खासदारांमध्ये नाराजी असल्याचंही बोललं जात आहे. याच नाराजीमुळे शिंदेंचे काही आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी करणार असल्याचा दावा अॅड. सरोदे यांनी केला आहे. सरोदे यांच्या दाव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Sharad Pawar News : कुणाच्या स्वागतासाठी सजले NCP कार्यालय; लंके, मोरे की अन्य कोणी ?

सरोदे नेमके काय म्हणाले?

चंद्रपुरातील (Chandrapur) निर्भय बनोच्या सभेत बोलताना असीम सरोदे म्हणाले, "पालघरला 'निर्भय बनो'ची मीटिंग झाली. या मीटिंगनंतर शिंदे गटातील काही आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनिवास वनगा, लता सोनावणे, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, उदयसिंह राजपूत, प्रदीप जयस्वाल, महेश शिंदे आणि प्रकाश आबिटकर हे आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शरण यायला तयार आहेत."

"ठाण्याच्या बाहेर शिंदेंना ओळख नाही" -

या सभेत सरोदे म्हणाले, "या आमदारांना एकनाथ शिंदेंबरोबर आपलं राजकीय भविष्य काहीही नसल्याचं लक्षात आलं आहे. एकनाथ शिंदेंची ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचेही काही आमदार परतणार आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंनी आता एवढं ठरवायला पाहिजे की, एकदा विकलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही? जर त्यांनी ठरवलं नाही तर आम्ही मतदार ठरवणार आहोत की, एकदा विकलेला नेता परत घेतला जाणार नाही. सरोदे यांच्या दाव्यामुळे सध्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com