Eknath Khadse : मोठी बातमी ! कथित भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण; खडसेंना न्यायालयाचा धक्का

Bhosari Land Scam : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना कथित भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांना कथित भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) नकार दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. खडसेंनी या प्रकरणातील दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. (Marathi News)

कथित भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला, म्हणजे याचा अर्थ असा नाही की खटला चालू शकत नाही. ट्रायल कोर्टाला पुन्हा याबाबत तपास करण्याचे आदेश देण्याचे अधिकार आहेत, असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Khadse
Shirur Lok Sabha News: राष्ट्रवादीतून आढळरावांच्या उमेदवारीस तीन वेळा इच्छुक असलेल्या माजी आमदाराचा विरोध; बंडाच्या तयारीत...

भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. तर या प्रकरणाबाबत एप्रिल 2018 मध्ये पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. पण ऑक्टोबर 2022 मध्ये हा क्लोजर रिपोर्ट मागे घेण्यात आला होता. तर क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्यानंतरही ऑक्टोबर 2022 ला पोलिसांना पुन्हा तपास करण्याची परवानगी देण्यात आल्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात (High Court) आव्हान दिलं होतं.

या याचिकेत करण्यात आलेली मागणी फेटाळत उच्च न्यायालयाने एकनाथ खडसे यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण काय आहे ?

पुण्यातील भोसरी येथे भूखंड घोटाळा (Bhosari Land Scam) झाल्याचा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून कोर्टात सुरु आहे.

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक जमीन खरेदी केली केली होती. ही जमीन मूळ बाजारभावाच्या अगदी कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Eknath Khadse
Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी ! साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना धक्का; भाजपने लोकसभेचं तिकीट कापलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com