Eknath Shinde Amol Khatal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena MLA News: एकनाथ शिंदेंचा लाडका आमदार अडचणीत; निवडणुकीच्या तोंडावरच 'ती' ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल

MLA Amol Khatal News: आमदार खताळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तयारीत असलेल्या आमदारांनी आपलाच कार्यकर्ता तिथं असावा, यासाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यात जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.पण एकनाथ शिंदेंचा हाच शिलेदार अडचणीत आला आहे.

Deepak Kulkarni

Sangamner News: काँग्रेसचे बाहुबली नेते, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार राहिलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर कितीही नाही म्हटलं, तरी संगमनेरचे शिवसेनेचे(Shivsena MLA) आमदार अमोल खताळ यांचा 'कॉन्फिडन्स' भलताच वाढला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेत राजकारण तापवण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता खताळ यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सध्या राज्यात मोठी धामधूम सुरू आहे. त्यामुळे कुरघोडी, फोडाफोडी यांच्यासह आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पेटलं आहे. याचदरम्यान, आता शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे आमदार अमोल खताळ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचं दिसून येत आहे.

आमदार खताळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तयारीत असलेल्या आमदारांनी आपलाच कार्यकर्ता तिथं असावा, यासाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यात जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.पण एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) हा शिलेदार अडचणीत आला आहे.

आमदार अमोल खताळ यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अरे तू कोण बोलतोय म्हणतो म्हणजे तू लई शहाणा दिसतोय रे.. तुला सांगुनही तू लई शहाणा झाला का हरामखोर.. तू शहाणपणा करतो का रे जास्त.. तुझा मालक कोण आहे?, त्याला मला फोन करायला लाव मला.. नाहीतर उद्या बंद करून टाकतो तुझं शोरुम.. एवढा शहाणा आहे का तू, का रे?…तुला सांगितलं तरी तू मला विचारतो कोण बोलतो?.. थांब तुझ्याकडे पहातो उद्या.. माजला काय जास्त तू?…या शिवराळ भाषा वापरल्याचं या क्लिपमध्ये दिसून येत आहे.

तसेच आमदार अमोल खताळ यांनी पुन्हा त्या व्यापाऱ्याला अरे ए.. त्या गाडीचे काय करायचे ते पाहतो.. मला मालकाचा नंबर पाठव.. 10 मिनिटात मला त्याचा फोन आला पाहिजे.. तू एवढा शहाणा झाला का?.. बघतो मी तू शोरुम इथे कसं चालवतो..एवढा माजलाय तू का रे, अशी धमकीही आमदारांनी दिल्याचं समोर आल्यानं विरोधकांनी शिवसेनेच्या खताळांवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे.

आमदार अमोल खताळ यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, ही ऑडिओ क्लिप जुनी असून त्यात मोठ्या प्रमाणात एडिटिंग करण्यात आली आहे. गाड्यांचा पार्ट बदलण्याचा प्रकार एक दोन वेळेस झाला होता, त्यामुळे आधीही आम्ही एक दोन वेळेस त्यांना जाब विचारला होता की, तुम्ही ग्राहकांची फसवणूक का करत आहात. पण कोणी चुकीचं काम करत असेल, तर शिवसेना स्टाईलनं उत्तर देण्याची धमक शिवसेनेचा आमदार आणि कार्यकर्ता म्हणून आपल्यात असल्याचंही खताळ यांनी यावेळी म्हटलं.

भाजप आमदार आशिष देशमुख यांनी तर थेट विरोधकांना कापून काढू अशी धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विरोधकांना उद्देशून ते यावेळी म्हणाले की, 'हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू, अशी उघड धमकी आशिष देशमुख यांनी दिली.

भाजपाच्या आक्रमक हिंदुत्ववादी नेत्या नवनीत राणा यांनी नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान,वादग्रस्त विधान केलं आहे. अचलपूर येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्रचार सभेत त्यांनी काल-परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्रीरामांच्या मंदिरावर धर्मध्वज फडकवला. पाकिस्तानकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. मी तुम्हाला आवाहन करते की, ‘जो धर्मध्वजपर उंगली उठाता है, उसकी उंगली काट देना चाहिये’. असं नवनीत राणा म्हणाल्या,

प्रत्यक्ष जाऊन बोट कापण्याची आवश्यकता नाही. ते हिंदूंच्या विरोधात जर एकत्र येत असतील, तर आम्हालाही बाहेर येऊन आमची एकता दाखवून दिली पाहिजे. कोणी बोट दाखवले, तर ते कापण्याचीही आपली तयारी असली पाहिजे,असंही राणा यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT