Nashik,11 April : नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराबाबत पेच आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना भाजपचा विरोध आहे. यावर पर्याय म्हणून मुख्यमंत्री शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव पुढे येऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोरस्तेचे नाव महायुतीच्या बैठकीत सूचविणार असल्याची माहिती आहे.
महायुतीच्या जागा वाटपाबाबत काही मतदारसंघावरून गंभीर वाद आहेत. घटक पक्ष या जागांवर आग्रही असल्याने त्याबाबतचा निर्णय लांबत चालला आहे. विशेषतः ठाणे आणि सिंधुदुर्ग हे मतदार संघ भाजपला हवे आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
औरंगाबाद आणि नाशिक (Nashik) या मतदारसंघांबाबतही तोच पेच आहे. नाशिकचा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला दिला जाणार आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटाला (Eknath shinde group) आपल्या हक्काच्या ठाणे आणि नाशिक मतदार संघावर पाणी सोडावे लागणार आहे. त्याला मुख्यमंत्री शिंदे तयार नाहीत. त्यामुळे हा पेच कसा सुटणार, यावर चर्चा होत आहे.
नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Ghodse) हे विद्यमान खासदार आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी मध्यस्थी करण्यात आली. मात्र त्यात यश आलेले नाही. त्यामुळे आता शिंदे गटाकडून पर्याय म्हणून जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste ) यांच्या नावाची सूचना करण्यात आली आहे. बोरस्ते यांनी यासंदर्भात आपल्या समर्थकांची बैठक घेऊन चर्चा केली आहे.
येत्या दोन दिवसांत त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून बोरस्ते यांच्या उमेदवारीचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी वेगळा टर्न घेत नाशिकची जागा राखण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
बोरस्ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख होते. त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. सध्या ते शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत. शहरातील सर्व परिचित चेहरा अशी त्यांची प्रतिमा आहे. महापालिकेचे नगरसेवक तसेच माजी उपमहापौर म्हणून त्यांनी काम केले आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे बोरस्ते यांना उमेदवारी मिळाल्यास नाशिकची जागा राखण्यासाठी महायुती यशस्वी होईल, असा दावा केला आहे.
त्यामुळे गेल्या दोन दिवसांत नाशिक मतदारसंघातील राजकारण एक वेगळे वळण घेताना दिसत आहे. महायुतीच्या जागा वाटपावरून सुरू झालेला वाद नाशिकच्या मतदारसंघातील उमेदवार बदलून सुटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.