Madha Lok Sabha 2024 : मोहिते पाटील आज पवारांना भेटणार; राष्ट्रवादी प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार

Dhairyasheel Mohite Patil Meet Sharad Pawar : मोहिते पाटील यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील समर्थकांना बुधवारी (ता. 10 एप्रिल) रात्री उशिरा पवारांना भेटण्यासंदर्भातचे निरोप देण्यात आले आहेत. त्यामुळे मोहिते पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार की पक्षप्रवेशाच्या तारीखेची घोषणा करणार, याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील हे आज शरद पवार यांना भेटल्यानंतर त्याबाबतची स्पष्टता येणार आहे.
Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Dhairyasheel Mohite Patil-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 April : गेली काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाबाबत आज निर्णायक दिवस ठरणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील आज ( (ता. 11 एप्रिल)) शरद पवार यांना भेटणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या भेटीवेळी मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रवेशाबाबतची आज अधिकृतरित्या घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोहिते पाटील यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील समर्थकांना बुधवारी (ता. 11 एप्रिल) रात्री उशिरा पवारांना भेटण्यासंदर्भातचे निरोप देण्यात आले आहेत. त्यामुळे मोहिते पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार की पक्षप्रवेशाच्या तारीखेची घोषणा करणार, याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) हे आज शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटल्यानंतर त्याबाबतची स्पष्टता येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Shashikant Shinde : उदयनराजेंविरूद्ध साताऱ्यातून उमेदवारी, कोण आहेत शशिकांत शिंदे

माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) इच्छूक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. कुठल्याही परिस्थितीत माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवायची असा निर्धार मोहिते पाटील यांनी केला आहे. लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांकडून शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, असा दबाव वाढत होता, त्यातच भाजपकडूनही मोहिते पाटील यांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर माढ्यातून ‘तुतारी’वर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी चिन्हावर लढावे, यासाठी त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटील हे प्रचंड आग्रही होते. मात्र, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपसोबत राहण्याची भूमिका होती. त्यामुळे राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मोहिते पाटील कुटुंबातही मतभिन्नता होती. शरद पवार यांच्या भेटीनंतर मोहिते पाटलांचा आज अधिकृत प्रवेश होणार की त्याबाबतची घोषणा होऊन 13 तारखेला अधिकृतरित्या प्रवेश होणार, हे आज स्पष्ट होणार आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांचे काय?

भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेवर आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांचा निर्णय काय असणार, याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला आहे. कारण रणजितसिंह हे अजूनही भाजपच्या सोबत राहण्याच्या मानसिकतेत असल्याचे सांगण्यात येते. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालेली मदत विसरता येणार नाही, असे त्यांचे मत आहे. मात्र, घरातील इतर सदस्य मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या मानसिकेत आहेत, त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांना शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करायचा असेल तर भाजपच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे रणजितसिंह यांच्या निर्णयाचे गूढ कायम आहे.

Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Sangli lok Sabha Election News : सांगलीतील धग कायम; विश्वजित कदम, पाटलांची माघार नाही, उलट 'मविआ'ला दिला 'हा' सल्ला

धैर्यशील यांच्यासोबत कोण कोण प्रवेश करणार?

धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत कोण कोण प्रवेश करणार, याचीही उत्सुकता आहे. कारण जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे, तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Karmala News: महायुतीच्या प्रचारापासून दूर असलेल्या नारायण पाटलांची चंद्रकांतदादांनी घेतली भेट...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com