Nashik Krantiveer Sangathan Office  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Swarajya Sangathana News : संभाजीराजेंच्या ‘स्वराज्य संघटने’च्या पहिल्या कार्यालयाला काही महिन्यांतच लागले टाळे

SambhajiRaje's Sangathana : गेल्या काही काळात स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि संघटनेचे तत्कालीन राज्य प्रवक्ते करण गायकर यांच्यात मोठ्या प्रमाणावर मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे.

Pradeep Pendhare

Nashik News : शेतकरी, कामगार, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांना डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यालयाला अवघ्या काही महिन्यातच टाळे लागले आहे. मोठा गाजावाजा करत माजी खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते नाशिकमधल्या मुंबई नाका येथे राज्यातील पहिल्या वहिल्या कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले होते. (First office of SambhajiRaje 'Swarajya Sanghatana' in the state was closed within a few months)

स्वराज्य संघटनेचे राज्य प्रवक्ते करण गायकर यांनी हे कार्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याचबरोबर राज्यात सर्वत्र स्वराज्य संघटनेचा मोठा विस्तार व्हावा, यासाठी दौरेही करण्यात आले होते. स्वराज्य संघटनेचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे यांचे त्यावेळी विश्वासू असलेले करण गायकर यांनी स्वतःची छावा क्रांतिवीर सेना देखील स्वराज्य संघटनेत विलीन केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या काही काळात स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि संघटनेचे तत्कालीन राज्य प्रवक्ते करण गायकर यांच्यात मोठ्या प्रमाणावर मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. या मतभेदाचा परिणाम थेट करण गायकर यांच्या पदावर झाला. गायकर यांना तातडीने राज्य प्रवक्ते पदावरून मुक्त करण्याचे पत्र संभाजीराजे यांनी दिले. या वादामागे मोठे कारण असल्याची चर्चा संघटनेत रंगली आहे.

विशेष म्हणजे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. संभाजीराजेंनीही २०२४ ची निवडणूक नाशिकमधून लढवावी, असाही कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यासाठी संभाजीराजेंना गळही घालण्यात आली होती. मात्र, आता स्वराज्य संघटनेचे राज्यातील एकमेव कार्यालय बंद झाले असून याच कार्यालयाच्या जागेचा ताबा छावा क्रांतिवीर सेनेने घेतला आहे. येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर संभाजीराजे छत्रपती यांच्याऐवजी भैयू महाराज यांचा फोटो लावण्यात आला आहे.

करण गायकर आणि त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी हेच स्वराज्य संघटनेत गेले होते. मात्र, सद्यस्थितीत कार्यालयाच्या जागेसह नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT