Girish Mahajan Won Jamner Assembly Constituency election 2022 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Won : भाजपचे संकटमोचक सातव्यांदा विजयी; जामनेरमध्ये दिलीप खोडपे यांचा पराभव

Jamner Assembly Constituency election 2024 final result : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खोडपे यांना उमेदवारी दिली होती. गिरीश महाजन हे आतापर्यंत सलग सहावेळा विजयी झाले आहेत. आता सातव्यांदा त्यांनी बाजी मारली आहे.

Mangesh Mahale

Jamner Assembly Constituency election 2024: जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झाला केला आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन व कधी काळी भाजपचे पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खोडपे यांना उमेदवारी दिली होती. गिरीश महाजन हे आतापर्यंत सलग सहावेळा विजयी झाले आहेत. आता सातव्यांदा त्यांनी बाजी मारली आहे.

आठव्या फेरीनंतर महाजन यांनी ९५११ मतांनी आघाडी घेतली महाजन यांना ४२५९४ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेदिलीप खोडपे यांना ३३०८३ मते मिळाली आहेत. मतमोजणी सुरु आहे.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दिलीप खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून ओळख आहे. एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1 लाख 40 हजार मतदान आहे. त्यामुळे दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या समोर तगडे आव्हान देतील शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे म्हणणे होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांना 1,13,765 तर संजय गरुड यांना 79,022 मतं पडली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

जामनेर मतदारसंघात ३ लाख १८ हजार ३६६ एवढे मतदार आहेत. मराठा कुणबी समाजाचे एकूण १ लाख ४० हजार ते १ लाख ५० हजार एवढे मतदार आहेत ( एकूण मतदानाच्या ४५ ते ५० टक्के)धनगर समाजाचे २० हजार मतदार आहेत (एकूण मतदानाच्या ७ टक्के), बंजारा समाज २५ हजार (७ टक्के), मंत्री गिरीश महाजन ज्या समाजातून आहेत त्या गुजर समाजाचे १८ ते २० हजार मतदार आहेत (७ टक्के), मुस्लिम समाजाचे ५० हजार (१६ टक्के), इतर समाजाचे ४० ते ४५ हजार (३ टक्के)अशा पद्धतीने जामनेर विधानसभा निवडणुकीत मराठा आणि कुणबी समाजाची ४५ ते ५० टक्के मतदार असून ते निर्णायक मतदार आहेत.

जामनेर विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे संजय गरुड यांच्यात मुख्य लढत झाली होती. संजय गरुड हे मराठा चेहरा म्हणून गिरीश महाजन यांच्या विरोधात मैदानात उतरले. या निवडणुकीत गिरीश महाजन यांना १ लाख १४ हजार ७१४ एवढे मतं पडली होती. यात एकूण मतदानाच्या ५४.९५ टक्के मते गिरीश महाजन यांना मिळाली होती.

या निवडणुकीत ३५ हजार १४ एवढ्या मतांनी गिरीश महाजन यांनी संजय गरुड यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांना मिळालेल्या मतांपैकी समाजनिहाय मतदानाचा विचार केल्यास, मराठा आणि कुणबी समाजाचे ४० ते ५० मतदान झाले होते. तर मुस्लिम आणि इतर समाजाचे ७० ते ८० टक्के मतदान होते. गिरीश महाजन यांचे विरोधक असलेले संजय गरुड हे आता भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे सध्या तरी गिरीश महाजन यांच्यासमोर प्रबळ आणि सक्षम उमेदवार नव्हता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT