Girish Mahajan-Gulabrao Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : ‘गिरीशभाऊ, तुम्ही दिल्लीला जा’; गुलाबरावांच्या कोटीला महाजनांचे उत्तर ‘का आमच्या जिवावर उठता?’

Girish Mahajan-Gulabrao Patil News : आगामी लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघातून गिरीश महाजन यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील चर्चेचा हाच धागा पकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील विनोदाने म्हणाले, गिरीशभाऊ पुढचे आमदार आहेत की, खासदार आहेत, याचे मला काही माहीत नाही.

कैलास शिंदे

Jalgaon News : गिरीशभाऊ, अमित शाह जळगावला आले होते, तुम्हाला दिल्लीला बोलावले आहे, असं समजलं. तुम्ही दिल्लीत जा, म्हणजे आमची लाइन क्लीअर होईल, असे हास्यविनोदात का होईना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजन यांनी दिल्लीला जावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर गिरीश महाजन यांनी ‘आपलं लव्ह मॅरेज आहे म्हणायचं आणि दुसरीकडे माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचं सांगून, मला दिल्लीला पाठवायचं म्हणजे इकडून पण गेले आणि तिकडून पण गेले. माझा पत्ता कट करण्याचा प्रयत्न करायचा! मला आता सावध राहावे लागेल बुवा!,' अशी कोपरखळी मारली.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे प्रादेशिक उपपरिवहन विभागाचे कार्यालय एसएच-५२ सुरू करण्यात आले आहे. त्याचे आज (ता. ७ मार्च) उद्घाटन करण्यात आले होते. चाळीसगाव येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या प्रयत्नाने कार्यालय मंजूर झाले आहे. या कार्यक्रमात महायुतीचे मंत्री व नेते उपस्थित होते. त्यात ही जुगलबंदी रंगली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील चर्चेचा हाच धागा पकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) विनोदाने म्हणाले, गिरीशभाऊ पुढचे आमदार आहेत की, खासदार आहेत, याचे मला काही माहीत नाही. अमित शाह (Amit Shah) जळगावात आले होते. तेव्हा ते म्हणाले, ‘आप दिल्ली चलो, आपके जैसा नेता हमको लगता है!’ गिरीशभाऊ दिल्लीला गेले म्हणजे आमची लाइन क्लीअर होऊन जाईल.’

मी त्यांना गेल्या दोन दिवसांपासून रोज चिडवतोय. फोन केला की मी म्हणतोय, ‘ काय खासदार साहेब बरं चाललंय का....गिरीशभाऊ तुम्ही मुंबईत असतात, मतदारसंघात लग्न तसेच इतर समारंभात तुमच्या पत्नी साधनाताईच गाठीभेटी घेऊन संपर्क ठेवत असतात. त्यांनी मतदारसंघात संपर्क ठेवायचा आणि तुम्ही आमदार व्हायचं, हे चांगलं नाही, आता तुम्ही साधना वहिनीनाचं आमदारकीचे तिकीट द्या, नाही तरी २०२९ मध्ये महिलांनाच उभे करावे लागणार आहे, असे पाटील म्हणाले.

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनीही आपल्या भाषणात गुलाबराव पाटील यांना मिश्‍कील उत्तर देत टोला लगावला, ते म्हणाले, गुलाबराव आम्हाला मित्र म्हणतात. दुसरीकडे आम्हाला दिल्लीला पाठवतात. जाऊ द्या दिल्लीला यांना म्हणजे आम्ही इकडे मोकळे. त्याच्याही वरचढ त्यांनी सांगितले की, आमदारकीही साधना वहिनींनाच द्या. म्हणजे इकडूनही गेले आणि तिकडूनही गेले, ही कसली मैत्री आहे. कसलं लव्ह मॅरेज आहे, एकीकडे लव्ह मॅरेज आहे, असं तुम्हीच म्हणता आणि एकीकडे आमच्या जिवावर टपून बसता, यांचा पत्ताच कट करा, मला आता तुमच्या सगळ्यापासून सावधच राहावे लागेल बुवा!

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT