Narhari Zirwal & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse News : दादा भुसेंकडून नरहरी झिरवाळ, काँग्रेसच्या खोसकरांची कोंडी?

Guardian minister Dada Bhuse created a political dilemma for Congress`s Hiraman khoskar-मतदारसंघातील आरोग्य केंद्रांच्या कामांबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ?

Sampat Devgire

Shivsene-Congress Politics : पालकमंत्र्यांच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या रोग्य विभागासाठी मार्च २०२३ मध्ये पुनर्विनियोजनातून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतीसाठी तरतूद न करता प्राथमिक आरोग्य दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघातील हे काम अडकले. (ZP Health department not agree to re-sanction of 4.70 cr. Works)

नियोजन समितीच्या (Nashik) बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) व आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी पुनर्विनियोजनातून आरोग्य विभागाच्या प्रशासकीय मान्यतांमध्ये परस्पर बदल का केले, याबाबत जिल्हा परिषद (ZP) यंत्रणेला धारेवर धरले होते.

राज्यात सत्तांतर झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व कामांना स्थगिती दिली होती. त्याचे अनुकरण नाशिकला करण्यात आले होते. त्याचा फटका आदिवासी आमदारांच्या मतदारसंघातील कामांना बसला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ, काँग्रेसचे आमदार हिरामण खोरकर यांच्या मतदारसंघातील ४.७० कोटींच्या कामांना बसला होता. त्यामुळे शिंदे गटाकडून या दोन्ही आमदारांची कोंडी केल्याचे चित्र आहे.

आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीच्या ज्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली होती ती कामे रद्द करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. मात्र, त्या घोषणेला महिना उलटूनही आरोग्य विभागाने त्या दुरुस्तीच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द केलेल्या नाहीत. त्यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि काँग्रेसचे आमदार खोसकर यांच्या मतदारसंघातील कामे आहेत. या आमदारांना प्रशासन दाद देत नसल्याने एक प्रकारे पालकमंत्र्यांकडून या दोन्ही आमदारांची राजकीय कोंडी केली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ व आमदार खोसकर यांनी ४.७० कोटींच्या निधीतून आरोग्य केंद्रांच्या नवीन कामांसाठी प्रशासकीय मान्यता दिलेली असताना त्यात परस्पर बदल करून त्या निधीतून दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता कशा दिल्या, असा प्रश्न करीत जिल्हा परिषद प्रशासनाला चागंलेच धारेवर धरले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी त्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT