MU Senate Election : 'राजाबाई टाॅवर' मंत्रालयासमोर झुकलेच; 'सिनेट'वरून ठाकरे गटाची शेलक्या शब्दात टीका !

Mumbai University Senate Election News : "आपण जिंकू शकत नाही म्हणून अगदी विद्यापीठाच्या पण नकोत, हे लोकशाहीला प्रचंड घातक.."
Mumbai University Senate Election News : Uddhav Thackeray
Mumbai University Senate Election News : Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुका अचानकपणे स्थगित केल्या आहेत. आठवड्यापूर्वीच मुंबई विद्यापीठाने या निवडणुका जाहीर केल्या होत्या, मात्र आठ दिवसांतच शिंदे-फडणवीस सरकारने परिपत्रक काढून जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 'अखेर 'राजाबाई टॉवर' मंत्रालयासमोर झुकला', अशा शेलक्या शब्दांत ठाकरे गटाचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सामंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची राळ उडवली.

Mumbai University Senate Election News : Uddhav Thackeray
Raj Thackeray Live Panvel : आता `मनसे`चे अमराठी पदाधिकारी पक्षाला अमराठींची साथ आणि मत मिळवून देणार ?

एकदा निवडणूक जाहीर केल्यानंतर तडकाफडकी असे निर्णय घेणे बेकायदेशीर आहे, हे सत्ताधाऱ्यांचे घाबरटपणाचे लक्षण आहे. आपला पराभव होणार म्हणून कोणत्याही निवडणुका नकोत, आपण जिंकू शकत नाही म्हणून अगदी विद्यापीठाच्याही निवडणुका नकोत, हे लोकशाहीला प्रचंड घातक असल्याची टीका, ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे.

'अखेर राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकलाच, त्याचा आम्ही युवासेना तीव्र शब्दात निषेध करीत आहोत, असे युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. सरकारसोबत असलेल्या पक्षांच्या विद्यार्थी आघाडीची तयारी नाही, त्यामुळे आपला पराभव निश्चित होणार, हे लक्षात आल्यानेच भाजप-शिंदे गटाने हा रडीचा डाव खेळला आहे, असे छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोहित ढाले म्हणाले.

Mumbai University Senate Election News : Uddhav Thackeray
Sushila Morale : बीडमध्ये शरद पवारांच्या सभेत जबरदस्त भाषण करणाऱ्या पुरोगामी विचारांच्या सुशीला मोराळे...

मुंबई विद्यापीठाने यापूर्वी जाहीर केलेल्या सिनेट निवडणुकांमध्ये उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शुक्रवार 18 ऑगस्ट 2023 अशी अंतिम मुदत देण्यात आली होती. तर १३ सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार होता. मात्र ऐनवेळी या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. राजकीय पक्ष, तसेच विद्यार्थी संघटनांकडून या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करण्यात येत होती. मात्र निवडणुकाच स्थगित झाल्याने, आता नाराजी व्यक्त केली जात आहे.

Mumbai University Senate Election News : Uddhav Thackeray
MU Senate Election : मोठी बातमी ! मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला अचानक स्थगिती; कारण मात्र गुलदस्त्यात..

निवडणुका स्थगितीचे कारण काय?

जाहीर झालेले मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांना स्थगिती दिली. मात्र स्थगिती देण्याचे कारण अजूनही स्पष्ट केले नाही. निवडणुका स्थगितीबाबत काढलेल्या परिपत्रकामध्ये कोणतेही ठोस कारण दिले गेले नाही. शिवाय यामागचे कारणही परिषेदेने माध्यमांना सांगितले नाही, त्यामुळे या घेतलेल्या निर्णयावर जोरदार चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com