Imran Pratapgarhi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress News: पंतप्रधान मोदी सुटी घेत नाहीत, मग अधिवेशनावेळी संसदेत का नसता?

If PM Modi doesn`t take leave then where he goes at Loksabha session-‘इंडिया’ आघाडीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडाली आहे.

Sampat Devgire

Nashik Congress News : हल्ली भक्त आणि भाजप असा डांगोरा पिटत आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात एकही रजा घेतली नाही. रजा घेतली नाही, तर संसदेचे अधिवेशन असताना ते कुठे होते? मणिपूर जळत होते तेव्हा कुठे होते? असा सवाल काँग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष, खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केला. (Congress MP Imran Pratapgadhi asks, whether PM will again take decision of demoneitisation)

काँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त गुरूवारी नाशिकमध्ये (Nashik) काँग्रेस (Congress) नेते इम्रान प्रतापगढी यांची सभा झाली.

यावेळी खासदार प्रतापगढी यांनी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांचे धोरण समाज आणि देशविरोधी आहे. त्यांनी काय काम केले, हे त्यांना आज देखील सांगता येत नाही, असा दावा त्यांनी केला.

ते म्हणाले, सध्या भाजप आणि भक्त मंडळी पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षात एकही सुटी घेतली नाही, असा दावा कीरत आहेत. काय बोलावे याला देखील मर्यादा असते. मात्र भाजपला त्याचे भान नाही. जर मोदी यांनी सुटी घेतली नसेल, तर बावीस दिवस संसदेचे अधिवेशन असताना ते वीस मिनीटेही हजर नसतात, तेव्हा कुठे असतात?. शेतकरी वर्षभर आंदोलन करीत होते, तेव्हा ते कुठे होते?. मणिपूर जळत होते तेव्हा कुठे होते?. महिला खेळाडू अत्याचारासाठी न्याय मागत होते, तेव्हा ते कुठे होते?, असा सवाल त्यांनी केला.

भारत व इंडिया या नावावरून देशात राजकारण पेटलेले असताना इंडिया हे नाव हटविण्यासाठी आता नोटबंदी कराल का, असा प्रश्न उपस्थित करीत अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगढी यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. इंडिया आणि भारत हे एकच आहेत. त्यासाठी कुठे-कुठे नावांमध्ये बदल कराल, आधारकार्ड, इस्रो, आयआयटी आणि नोटांवरील इंडिया नाव हटवाल का, असा थेट प्रश्न पंतप्रधानांना विचारत खासदार प्रतापगढी यांनी भाजपच्या नेत्यांवर चौफेर टीकास्त्र सोडले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, सचिव राहुल दिवे, राजीव वाघमारे, आमदार वजात मिर्झा, हनिफ बशीर यांनीही आपले मनोगत मांडले.

या वेळी आमदार हिरामण खोसकर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, अहमद खान, डॉ. जफर खान, स्वाती जाधव, वत्सला खैरे, ज्ञानेश्वर काळे, स्वप्नील पाटील, इम्रान पठाण यांच्यासह जुन्या नाशिक भागातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT