Anil Kadam with farmers at Niphad
Anil Kadam with farmers at Niphad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anil Kadam News : अन्यथा महावितरणला शिवसेनेच्या भाषेत समज देऊ!

Sampat Devgire

Niphad farmers agitation : पाऊस नसल्याने शेतकरी दुष्काळाच्या संकटात लोटला गेला आहे. अशा स्थितीती पिके वाचविण्यासाठी त्याला मदतीची गरज आहे. महावितरणने वीजपुरवठा बंद करून अडचण करू नये. तसे केल्यास शिवसेनेच्या भाषेत समज देण्यात येईल, अशा खणखणीत भाषेत माजी आमदार अनिल कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडसावले. (Shivsena ex MLA active on Farmers issue of electricity in Niphad)

निफाड (Niphad) तालुक्यातील शेतकरी (Farmers) आपल्या द्राक्षबागा तसेच अन्य पिके कशी वाचवावीत या संकटात आहेत. त्याबाबत शिवसेनेचे (Shivsena) नेते, माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) त्यांच्या मदतीला धाऊन आले आहेत.

निफाड तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाटबंधारे विभाग व महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांची उभी पिके हातातून निसटून चालली आहेत. याबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास सोमवारी निफाड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार कदम यांनी दिला.

तालुक्यात सगळीकडे अल्प पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाणगंगा काठावरील ओझर, दात्याणे, दिक्षी, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, कसबे-सुकेणे, मौजे सुकेणे, खेरवाडी, पिंपळस, चितेगाव या गावांना गंगापूर कॅनॉलचे पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कसबे-सुकेणे येथे माजी आमदार कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तीत ते बोलत होते. श्री. कदम यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे व शाखा अभियंता पवार यांच्याशी चर्चा करून १२ सप्टेंबरपर्यंत पाणी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.

बैठकीत पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. श्री. कदम यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला फैलावर घेतले व सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा व वीज कंपनीच्या निफाड तालुक्यातील सर्व कार्यालयांना टाळे ठोकण्याचा निर्वाणीचा इशारा दिला.

शेतकऱ्यांसमक्ष वीज कंपनीचे मुख्य अभियंता कुमठेकर यांच्याशी त्यांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. बैठकीस जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक शिरसाठ, कसबे-सुकेणेचे सरपंच आनंदराव भंडारे, सुनील कदम, आनंदराव बोराडे, विश्वास भंडारे, बाळासाहेब जाधव, सुहास भंडारेयांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT