Imtiaz Jaleel vs Sangram Jagtap Sarkarnma
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar MIM Sabha: अहिल्यानगरमधून इम्तियाज जलील यांचा संग्राम जगताप अन् राणेंना 'करारा जवाब' ; म्हणाले,चिकनी चमेली,चिल्लर,छोटासा चिंटू...

Imtiaz Jaleel vs Sangram Jagtap : अहिल्यानगरमध्ये झालेल्या एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींच्या सभेत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हिंदुत्त्वाचा कडवा पुरस्कार करणाऱ्या भाजपचे आमदार नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

Deepak Kulkarni

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहरात काही दिवसांपूर्वी दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीत ‘आय लव्ह मोहम्मद’ हे नाव लिहिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे घडलेल्या या घटनेमुळे हिंसाचार उफाळला होता. जमावाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. यानंतर अहिल्यानगरमध्ये झालेल्या एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींच्या सभेत माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी हिंदुत्त्वाचा कडवा पुरस्कार करणाऱ्या भाजपचे आमदार नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

अहिल्यानगर शहरातील बहु मुस्लिम भाग असलेल्या मुकुंदनगरमध्ये गुरूवारी (ता.09) असदुद्दीन ओवैसी यांची पहिलीच सभा झाली.या सभेची जोरदार तयारी 'AIMIM'चे कार्यकर्त्यांनी केली होती. पोलिस परवानगी असून देखील एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमध्ये काही दिवसांपूर्वी उफाळलेल्या हिंसाचाराच्या धर्तीवर आठवड्याभरापूर्वी होणारी सभा रद्द करण्यात आली होती.पुढील आठवड्यात नक्की येईल,तसा शब्द दिला,सभेच्या तयारीसाठी राबलेले कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली होती.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या अहिल्यानगरच्या सभेत माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आक्रमक शैलीत भाषण केलं. यावेळी त्यांनी भाषणात मंत्री तथा भाजप आमदार नितेश राणे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्यावर जहरी टीका केली. यावेळी इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंचा 'छोटासा चिंटू'तर संग्राम जगताप यांचा चिकनी चमेली उल्लेख करत डिवचलं.

इम्तियाज जलील म्हणाले,आज कुणीही उठतं आणि मुस्लिमांना शिव्या देतं.राजकारण करायचं तर मुस्लिमांना शिव्या द्यायच्या अशी फॅशन सध्या सुरु झाली आहे.आधी छोटासा चिंटू बोलायचा, आता तुमच्या शहरात चिकनी चमेली आली असल्याचा खोचक टोलाही इम्तियाज जलील यांनी दोन्ही नेत्यांना लगावला.

पोलिसांचे आमच्यावर एवढं प्रेम का आहे माहिती नाही,पण आम्ही आलो की,पोलिसांकडून आमच्या हातात तीन-तीन पानांचं प्रेमपत्र दिलं जातं.त्या पत्रात तुम्ही असं बोलू नका,हे करू नका असं लिहिलेलं असतं. आजची सभा पोलिसांच्या म्हणण्यानुसार झाली आहे. पण यापुढे जर नगर शहरात कोणत्याही स्टेजवर मुस्लिम विरोधात शिव्या दिल्या गेल्या, तर आम्हाला पण उत्तर देता येतं हे पोलिसांनी लक्षात ठेवावं,असा इशाराही इम्तियाज जलील यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्रात निवडणुका येत असून दंगली पेटवत माहोल खराब केला जातो असल्याची टीकाही इम्तियाज जलील यांनी यावेळी केली. तसेच कोणी म्हणत आमच्या मागे अजित पवार आहे,कुणी म्हणतं आमच्या मागे फडणवीस आहे,कुणी म्हणतं शिंदे आमच्या मागे आहेत.पण,या सगळ्यांना आम्ही सोडलं नाही तर तू (संग्राम जगताप ) कोण आहे, अशा शब्दांत आमदार जगताप यांना इम्तियाज जलील यांना आव्हान दिलं. बाप तो बाप होता है..असंही ते म्हणाले.

आम्ही मोदीला सोडत नाही, तू तर काय चीज आहे, चिल्लर असंही इम्तियाज जलील यांनी संग्राम जगताप यांना म्हटलं. मी कुणाचेही नाव घेतलेलं नाही, मीडियावाल्यांना काय चालवायचे ते चालवू द्या असंही सांगायला इम्तियाज जलील हे विसरले नाहीत.

मुस्लिमांच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरात दुर्गा दौडच्या स्वागतासाठी फुलांची रांगोळी काढण्यात आली होती.या रांगोळीत इंग्रजी अक्षरात प्रेषित पैगंबर यांचे नाव रेखाटण्यात आले होते. तसेच आय लव्ह मोहम्मद नावाची रांगोळीही काढण्यात आली होती.या रांगोळीवरुन दौड नेण्यासाठी व्यवस्था करून देत जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याप्रकरणी आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर (रा. बारा तोटी कारंजा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अल्तमश सलीम जरीवाला यांनी फिर्याद दिली आहे.

आंदोलनाला हिंसक वळण

या घटनेनंतर व पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे आक्रमक झालेला मुस्लिम समाज कोटला परिसरात महामार्गावर उतरला होता. जमावानं महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. पण आंदोलनादरम्यान काही युवकांनी रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक केल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागले.पोलिसांनी तत्काळ आंदोलकांवर लाठीमार करत जमावाला पांगवलं होतं. त्यामुळे पळापळ झाली. या घटनेमुळे कोठला परिसरात व संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT